माझ्या भिमाचं काळीज वाघाचं | Majhya Bhimach kalij waghach song lyrics

ध्येय्य त्याचं एक बहुजनांच सुख
हितासाठी सर्व त्यागाचं
माझ्या भिमाचं काळीज वाघांचं

बहुजनांच्या हितासाठी भीमराया झटला
कार्याने त्यांच्या देश सारा नटाला
जाणुन पाऊल फुल्याच्या मागाच
माझ्या भिमाचं काळीज वाघांचं

बुध्द कबीर फुलेंची धरूनिया वाट
जातीवादी सैतानाचा केला नायनाट
जाळून मारलं पिल्लू नागाचं
माझ्या भीमाचं काळीज वाघाचं

चवदार तळ्याच्या काठी लढला तो वीर
जातीवादी पिल्लं तवा झाली बघा गार
माप नव्हतं त्यांचा रागाचं
माझ्या भिमाचं काळीज वाघांचं

भीमराया मुळे आम्हा बुध्द तो मिळाला
त्यांच्या मुळे संघाचा महिमा काळाला.
राजेश नंदु वंदन दोघांचं

माझ्या भिमाचं काळीज वाघांचं
माझ्या भिमाचं काळीज वाघांचं