महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना

महाराष्ट्रातल्या बऱ्याच शासकीय तथा खाजगी रुग्णालयात ही योजना उपलब्ध आहे.
ज्याच्याकडे पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड आहे त्या रुग्णाना या योजने अंतर्गत लाभ घेता येतो.
ज्या शेतकऱ्यांकडे पांढरे रेशनकार्ड आहे अश्या १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील रुग्णानांही ह्याचा लाभ घेता येतो.
ह्या योजने अंतर्गत एका कुटुंबाला प्रत्येक वर्षी कमाल दीड लाख रुपये इतका आरोग्य खर्च करता येतो.
(1.5 lakh rupees per family per year)
ह्या योजने अंतर्गत तब्बल ९७१ वेगवेगळ्या उपचार पद्धती/ शस्त्रक्रिया करता येतात.
गरजेची कागदपत्र :
१. पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड (दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पांढरे)
२. आधार कार्ड/पॅनकार्ड/वोटिंग कार्ड/पासपोर्ट/बँकेचे पासबुक/ ड्राइविंग लायसंस इ.
अगदी अँजिओप्लास्टी, व्हॅल्व्ह रिप्लेसमेंट,प्लास्टिक सर्जरीज अश्या अनेक मोठ्या शस्त्रक्रियाही या योजने अंतर्गत येतात.
अनेकवेळा रुग्णाना फक्त पैश्या अभावी मोठ्या शस्त्रक्रिया करता येत नाहीत, MJPJAY योजना त्यांना लाभदायक ठरु शकते.
आपण लाभ घेऊ शकता अथवा गरजू पर्यंत ही माहिती पोहचवू शकता.
अधिक माहिती साठी कंमेन्ट मध्ये लिंक देत आहे.
त्यात about मध्ये गेल्यावर MJPJAY Scheme मध्ये माहिती, तर Operational Guidelines मध्ये Package Cost मध्ये गेल्यास वापरू शकणाऱ्या रकमेची माहिती मिळु शकेल. तसेच Network Hospitals मध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार योजने अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांची यादी मिळेल.
आरोग्य परमा लाभा !
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?