ज्याने प्रेमाने जिंकले जगा वीर असा गौतम आहे | Jyane Premane Jinkile Jaga Lyrics

ज्याने प्रेमाने जिंकले मना |
वीर असा कोण आहे ? ||
ज्याने प्रेमाने जिंकले जगा |
वीर असा गौतम आहे. ||धृ||
मानवी मन आहे. |
तिथेच तन आहे ||
साऱ्या दू:खाचे खरे.|
तेच कारण आहे||
उपाशी जन आहे.|
भूके मरण आहे. ||
परंतु दुसरी कडे .|
भरपूर धन आहे. ||
कुठे अड़चन आहे.|
दुबळे मन आहे. ||
परी चोरांचे घरी. |
सदैव सण आहे. ||
जिथे दुर्जन आहे. |
नीच वर्तन आहे. ||
असल्या भूमिवरी.|
जीवाचे दैन्य आहे.||
कुना बंधन आहे.|
धाक दडपण आहे.||
कुणाच्या जाचामुळे.|
कुणी बेचैन आहे. ||
रोज भांडण आहे.|
रन कंदन आहे. ||
असली सारी भूमि.|
जळती वन आहे. ||
भेदा भेद नको. |
इतशीर खेद नको. ||
कुणाच्या जाचामुळे.|
कुणालाखेद नको. ||
ऐतखाऊ नको.|
मिशिवर ताव नको ||
रस रंकाचे घरी.|
असला राव नको. ||
थोर शिकवण अशी. |
लोक विसरले कशी. ||
इच्छा अंतरिची आहे. |
जशीच्या तशी. ||
आत्म तिराने छेदिले. ||
वीर असा कोण आहे.? ||१ ||
ज्याने प्रेमाने जिंकले मना |
वीर असा कोण आहे ? ||
ज्याने प्रेमाने जिंकले जगा |
वीर असा गौतम आहे ||
मन ओढाळ आहे |
मोठ खोदसाळ आहे ||
कधी हे गोड कधी |
गमे चांडाळ आहे ||
मन हे काळ आहे |
तस मधाळ आहे ||
कधी विक्राळ असे |
कुकुल बाळ आहे ||
मन मारून उडी |
सोडून प्रिय कुढी ||
नको त्या घानी मध्ये |
बापुडे मारी उडी ||
मन पर घडो घड़ी |
बाटवुनी प्रिय कुड़ी ||
तुडवुनी धम्म रूढ़ी |
करी पापाची चूढी ||
मन हे आग आहे |
विषारी नाग आहे ||
मनच मानवाचा |
शिलाचा डाग आहे ||
मन हे उतावळे |
वासना पाठी पळे ||
वाईटांची अशी मने |
नाते पटकन जुळे ||
जीवन हे ज्यांचे जळे |
त्याला हे ना कळे ||
चालली विनाशा कडे |
त्याच वाटाने पळे ||
वळता बुद्धा कडे |
परिवर्तन घड़े ||
नितीच्या नागरी मध्ये |
रंग जीवनाला चढ़े ||
मना समतोल ठेव सदा |
वीर असा कोण आहे ? || २ ||
ज्याने प्रेमाने जिंकले मना |
वीर असा कोण आहे ? ||
ज्याने प्रेमाने जिंकले जगा |
वीर असा गौतम आहे. ||
शाक्य अलीकडे. |
कोलिय पलीकडे. ||
मधी रोहिणी नदी. |
ठिणगी तेथे पड़े. ||
दुष्काळ दोन्ही कड़े. |
प्रजेला पेच पड़े. ||
प्राण वाचावे कसे. |
चिंता हीच पड़े. ||
आटले नाले ओढ़े. |
नदीला पाणी थोड़े. ||
पाणी पाणी करुन. |
प्राणी तडफड़े. ||
येऊन राजाकडे. |
जनता सारी रडे. ||
कराव काय आता. |
प्रश्न हा राजापुढे. ||
जमले बड़े बड़े. |
सभेला रंग चढ़े. ||
मने सर्वांची येथे. |
वाळाली नाशाकडे ||
म्हणती यारे पुढे. |
व्हारे युद्धाला खड़े. ||
पाणी रोहिनीचे ते.|
वळवा शाक्यांकडे. ||
जर आडवाया आले. |
हात भिरवाया आले. ||
कोलिय कोकरे ती. |
रगड़ा जैसे कीड़े. ||
दयेचे फुटले चुढे. |
नितीचे निघले मढ़े. ||
मन बुद्धाचे रडे. |
म्हणे हे काय घड़े. ||
नका रे युद्ध करू. |
नका रे मन मारू. ||
आल संकट तरी. |
यारे सारेच तरु. ||
ती तलवार नको. |
अत्याच्यार नको. ||
जिव जाळून दूजे. |
हा उद्धार नको. ||
हेच बुद्धाचे चरण.|
गेले त्याला शरण.||
वामन हेच खरे.||
ना फुटनारे धरण.||
ज्याचे अस्तित्व राहील सदा.|
वीर असा कोण आहे. ?||
ज्याने प्रेमाने जिंकले मना.|
वीर असा कोण आहे. ?||
ज्याने प्रेमाने जिंकले जगा ||
वीर असा गौतम आहे. ||
*****************************
कवी:- वामन दादा कार्डक