जीवनातल्या मंदिरी बांधा पुजा समतेची
अनुसरा शिकवण बुद्धाची
अज्ञानी हा समाज सगळा
दैवा हाती माणूस दुबळा
सरवावरती पाखर असू द्या आपुल्या मायेची
अनुसरा शिकवण बुद्धाची
युद्धा मधुनी विनाश आहे
विनाशातूणी दुखच वाहे
शस्त्रा हुणी ही महान जगती, शांति अहिंसेची
अनुसरा शिकवण बुद्धाची
दीप आपुला आपण व्हारे
सम अज्ञाना दूर करा रे
हृदयी आपुल्या ओढ असूद्या सम्यक ज्ञानाची
अनुसरा शिकवण बुद्धाची