समाजातील जातीय व्यवस्था समाप्त करण्यासाठी आंतरजातीय विवाह होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातील समाज कल्याण विभागा तर्फे आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास रोख रुपये ५०,०००/- देण्याची तरतूद आहे.
आंतरजातीय विवाह ही सामाजिक विषमता दूर करण्यासाठी एक आवश्यक बाब आहे. त्यासाठी आंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासकीय स्तरावरून आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे.
त्याकरिता विहित नमुन्यात अर्ज आपापल्या जिल्ह्यातील समाजकल्याण विभागामध्ये सादर करावे.
अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1 | योजनेचे नांव | आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना |
2. | योजनेचा प्रकार | राज्य |
3. | योजनेचा उद्देश | अस्पृश्यता निवारण करण्याचा एक भाग म्हणून आंरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक योजना |
4. | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव | महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी |
5. | योजनेच्या प्रमुख अटी | लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा लाभार्थी /विवाहीत जोडप्या पैकी एकजण हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.( जातीचा दाखला देणे आवश्यक)लाभार्थी /विवाहीत जोडप्या विवाह नोंदणी /दाखला असावा.विवाहीत जोडप्याचे लग्न समयी वय वराचे 21 वर्षे व वधूचे 18 वर्षे पूर्ण असावे.( वर/वधु यांचे शाळा सोडल्याचे दाखले)दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्रे वधु /वराचे एकत्रित फोटो. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या |
6. | दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप | आंतर जातीय विवाहास रु 50000/- पतीपत्नीच्या सयुक्त नांवाने धनाकर्ष. |
7. | अर्ज करण्याची पध्दत | विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडून घेऊन विवाहीत जोडप्याने अर्जात नमूद कागदपत्राच्या मुळ व प्रमाणित प्रतीसह अर्ज प्रत्यक्षात सादर करावा. |
8. | योजनेची वर्गवारी | सामाजिक सुधारणा |
9. | संपर्क कार्यालयाचे नांव | संबधीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/ मुंबई शहर व उपनगरसाठी समाज कल्याण अधिकारीबृहमुंबईचेंबूर |
Information Source: https://sjsa.maharashtra.gov.in/en/scheme-category/social-integration