हे पानी आणिले मी | He Paani Anile Mi Bhim song Lyrics

हे पानी आणिले मी माठ भरूणी
हे घोट भर जा हो पिऊनी

नव्हे मानस सारीच सैतान ही
भिमबाबा यांना मुळी जाण ही
हे मोठ्या श्रद्धेनी हे मोठ्या श्रद्धेनी
आलो मी घेऊनी
हे घोट भर जा हो पिऊनी
हे पानी आणिले मी माठ भरूणी
हे घोट भर जा हो पिऊनी

भर उन्हात व्याकुळ जीव थांबला
शब्द कर्मठांचा जिव्हारी तो झोंबला
तो दाही दिशा पाही तो दाही दिशा पाही
तक लाउनी
हे घोट भर जा हो पिऊनी
हे पानी आणिले मी माठ भरूणी
हे घोट भर जा हो पिऊनी

जीव जीवात हा होता त्याच्या जोवर
पाणी घेउनी वाट पहिली तो वर
तो प्राण सोडीला तो प्राण सोडीला
बाबा म्हणूणी
हे घोट भर जा हो पिऊनी
हे पानी आणिले मी माठ भरूणी
हे घोट भर जा हो पिऊनी

बोले सोनबा भीम बाबा येतील
पाणी घोटभर माझ्या हाती घेतील
तो धन्य प्रभाकरा तो धन्य प्रभाकरा
वाट पाहुणी
हे घोट भर जा हो पिऊनी
हे पानी आणिले मी माठ भरूणी
हे घोट भर जा हो पिऊनी

हे पानी आणिले मी माठ भरूणी
हे घोट भर जा हो पिऊनी
हे पानी आणिले मी माठ भरूणी
हे घोट भर जा हो पिऊनी

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?