दलित पँथर

#पासष्ट सत्तरच्या दशकात भारतात जातीय अन्याय अत्याचाराने अक्षरशः परिसीमा ओलांडली होती जातीवाद इतका बोकाळला होता की दिवसा ढवळ्या दलितांना अमानुषपणे मारहाण करणे,हत्या करणे,स्त्रियांच्या अब्रू लुटणे असले अमानवी प्रकार छातीठोकपणे सरंजामी आणि जातीय प्रवृत्तीचे लोकं करीत होते,त्याच दरम्यान पेरुमल समितीचा अहवाल जाहीर झाला ज्यात आकडेवारी सहीत दलितांवर होणाऱ्या अन्यायाचा सर्व लेखाजोखा मांडण्यात आला होता,त्यामूळे दलित तरुणांच्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला व ब्लॅक पँथरच्या धर्तीवर देशात 29 मे 1972 ला दलित पँथर या आक्रमक आणि निर्भीड जीवाची पर्वा न करता आरपारची लढाई लढणाऱ्या संघटनेचा जन्म झाला,आक्रमक भाषणं लढाऊ वृत्ती मनुवाद्यांच्या बुडाला आग लावणार भयंकर विद्रोही लिखाण आणि थेट जातिवाद्यांना ठोकून काढणे हे दलित पँथरची खास वैशिष्ट होतं.पुढे चालून गटबाजीने बाधित होऊन पँथरची अनेक शकले पडली परंतु संघर्ष करण्याची उर्मी आणि बाबासाहेबांचे समतावादी विचार व समताधिष्टीत समाज निर्मितीचा वसा जपण्याचं काम आज ही आंबेडकरवादी पँथर करतोय आणि करत राहील.त्याकाळी एक असा देखील वर्ग होता जो अस्वस्थ होऊन विचार करायचा व त्यांची ठाम धारणा होती की या पँथर्सच्या आगमनामुळे कुठे तरी बाबासाहेबांच्या लोकशाही मुल्यांना तडा जाऊन रिपब्लिकन संकल्पना लोप पावेल कदाचित यावर तज्ञ मंडळींकडून अनेकदा विचारमंथन देखील झाले आहे.वाढत्या अन्यायाच्या विरोधात तत्कालीन आक्रमक तरुणांनी दिलेली तीव्र प्रतिक्रिया म्हणजेच पँथर होती एवढं निश्चितच आवर्जून मांडाव लागेल.
#जातीयवादी प्रवृत्तीच्या अमानवी लोकांच्या कोथळ्याला वाघ नखं लावणाऱ्या त्या सर्व पँथर्सला मानाचा जय भीम
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?