राज्य शासनाकडून एकूण ३ प्रकारच्या शिष्यवृत्त्या मंजूर केल्या जातात. त्या खालीलप्रमाणे.
१) राज्य सरकारची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती.– गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास उत्तेजन मिळावे म्हणून शासनाकडून ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यालयांमधून प्रतिवर्षी पदवी परीक्षेपर्यंत व विधी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यास त्यासाठी जादा दोन वर्षांपर्यंत दिली जाते.
२) गणित व भौतिकशास्त्र विषयांतील शिष्यवृत्ती.– गणित व भौतिकशास्त्र या विषयात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही शिष्यवृत्ती सुरु करण्यात आलेली आहे. बी. एस्सी. पदवी परीक्षेसाठी गणित व भौतिकशास्त्र हे विषय विद्यार्थ्यांनी घ्यावेत हा हेतू आहे.
३) शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्त्या.– शासनाच्या पुसेगाव, धुळे, औरंगाबाद व अमरावती या विद्यानिकेतनांमधून सदर परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवणाऱ्या प्रत्येक विद्यानिकेतनांमधील प्रत्येक २० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.