चांदण्याची छाया कापराची काया | Chandanyachi Chhaya Lyrics |

Song – Chandanyachi Chhaya Kaparachi Kaya

Lyrics by – Vaman Dada Kardak

Album – Navkoticha Raja

Singer – Pralhad Shinde

Music by – Anand Shinde

Music Label – T- series

 

चांदण्याची छाया कापराची काया

चांदण्याची छाया, कापराची काया

माऊलीची माया होता, माझा भीमराया

 

चोचीतला चारा, देत होता सारा

आईचा उबारा देत होता सारा ;

भीमाईपरी चिल्यापिल्यांवरी

पंख पांघराया होता, माझा भीमराया

 

बोलतात सारे, विकासाची भाषा

लोपली निराशा आता लोपली निराशा;

सात कोटी मधी, विकासाच्या आधी

विकासाचा पाया होता, माझा भीमराया

 

झाले नवे नेते, मलाईचे धनी

वामनच्या मनी येती जुन्या आठवणी;

झुंज दिली खरी, रामकुंडावरी

दगड गोटे खाया होता, माझा भीमराया

 

चांदण्याची छाया कापराची काया

चांदण्याची छाया, कापराची काया

माऊलीची माया होता, माझा भीमराया…

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?