| पैलू | माहिती |
|---|---|
| Singer | Krishna Shinde (Spotify आणि YouTube स्रोताद्वारे) |
| Lyricist | प्रशांत अंबादे (गीतरचना म्हणून उल्लेखित) |
| Album | Dikshabhumi Te Chaityabhumi (अल्बम संदर्भतः) |
थांबा थांबा, जाळता का चंदनाची ही चिता
पाहुद्या डोळा भरून मज भीम हा माझा पिता
थांबा थांबा …
राहिले कोंदण हे केवळ, गळुनी पडला नीलमणी
चंद्रावाचून काय शोभा, यायची तारांगणी
राहिले ना स्वर या कंठी, काय गावे संगीता
पाहुद्या डोळा भरून मज भीम हा माझा पिता
थांबा थांबा …
विश्व हे दीन दुःखितांचे, जाहले सुने सुने
एक भीमावाचुनी वाटेल जग सारे उणे
ही चिता विझणार नाही, केला जरी सागर रिता
पाहुद्या डोळा भरून मज भीम हा माझा पिता
थांबा थांबा …
जो जळत होता रविसम त्यास का अग्नी हवा
चंदनाला लाजवी कीर्ती सुगंधित ही हवा
मन फुलासम ज्याचे कोमल, त्यास सुमने अर्पिता
पाहुद्या डोळा भरून मज भीम हा माझा पिता
थांबा थांबा …
काळवंडून आज गेल्या, आशेच्या दाही दिशा
ओ.., होऊनी हीनदीन हृदयाचे प्रतीक रडते निशा
अश्रू ढाळी भावनाही, हुंदका दे अस्मिता
ओ.., होऊनी हीनदीन हृदयाचे प्रतीक रडते निशा
अश्रू ढाळी भावनाही, हुंदका दे अस्मिता
पाहुद्या डोळा भरून मज भीम हा माझा पिता
थांबा थांबा …
थांबा थांबा …
या प्रशांताला अशांत, करीतसे आकांत हा
झोपूद्या निर्वाण पथिका जाहला बहू श्रांत हा
नष्टविता का तया जो देतसे नवजीविता
झोपूद्या निर्वाण पथिका जाहला बहू श्रांत हा
नष्टविता का तया जो देतसे नवजीविता
पाहुद्या डोळा भरून मज भीम हा माझा पिता
थांबा थांबा …
थांबा थांबा …
गीतरचना: प्रशांत अंबादे
‘दीक्षाभूमी ते चैत्यभूमी’
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.


