बुद्धाची ओढ

सावली या पिंपळाची

खरचं गोड आहे
म्हणुन या जगाला
बुद्धाची ओढ आहे.

धम्म तथागताचा
करुणेचा सिंधु
दया, क्षमा, शांती
हेच केंद्रबिंदु.

उचनीचतेला इथे
नाही कुठेचं थारा
फक्त माणुसकीचा
वाहतो शुद्ध वारा…
🙏जय भीम नमो बुद्धाय🙏