बौद्ध धम्मातील आदर्श स्त्री रत्ने

बौद्ध धम्मातील आदर्श स्त्री रत्ने
♀भिक्षुणी पटाचारा♀
भगवान बुद्धांच्या काळात श्रावस्ती हे शहर होते. तिथे अत्यंत श्रीमंत कुटुंबात एका सावकाराच्या घरात कन्यारत्न झाले. ही मुलगी वयात आल्यावर तिच्या आईवडिलांनी तिच्या लग्नाचा विचार सुरू केला. एका तरुणाबरोबर तिचा विवाह ठरविण्यात आला. परंतु सावकाराच्या घरातील नोकराबरोबर त्या मुलीने लग्न करण्याचे ठरविले आणि ठरविलेल्या मुलाशी लग्न होण्याआधी ती त्या नोकरासोबत निघून गेली. जातांना दाग दागिने मोठया प्रमाणावर घेऊन गेली.
नोकर आणि ती मुलगी श्रावस्तीहून 3-4किलोमीटर लांब असलेल्या खेडेगावात राहू लागली. तो नोकर मुलगा मोलमजुरी करून त्याचा उदरनिर्वाह करत होता. इकडे तिच्या आईवडिलांनी तिची कोणाकडे काहीच चौकशी केली नाही. आपली मुलगी एका नोकराबरोबर निघून गेली ह्या गोष्टीचे त्यांना फार दुःख झाले होते.काही दिवसांनी ती गर्भवती झाली. नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिला तिच्या आईवडिलांकडे जाण्याची इच्छा तिच्या नवऱ्याकडे केली. त्याला ते मान्य नव्हते तो आज -अस करू लागला.
शेवटी एक दिवस तीच नवरा कामाला गेल्यानंतर एकटीच माहेरी जाण्यासाठी निघाली.
रस्त्याने जाता जाता मध्येच एका झाडाजवळ थांबली. काही वेळाने तिचा पती शोधत तेथे आला. तेव्हा त्या झाडाच्या आडोश्याला ती प्रसूत झाली होती तिला पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्या दोघांनी श्रावस्तीला जाण्याचा बेत रहित केला. ते त्यांच्या राहत्या घरी परतले. सुखाने राहू लागले.
पुन्हा ती गर्भवती राहिली नऊ महिने पूर्ण झाल्यावर पुन्हा तिने पतिकडे याचना केली. तेव्हा सुद्धा तो नाही म्हणाला. नवरा माहेरी जाण्यास परवानगी देत नाही म्हणून ती तो कामावर गेल्यानंतर मुलाला घेऊन माहेरी जाण्यास निघाली. रस्त्याने बराच अंतरावर गेली असता तिच्या नवऱ्याने तिला गाठले. थोड्याच वेळात ढगांचा गडगडाट सुरू झाला. पाऊस देखील सुरू झाला आणि इकडे तिला प्रसव वेदना सुरू झाल्या .अशा स्थितीत आपल्यावर काहीतरी आच्छादन असावे, निवारा असावा असे ती नवऱ्याला म्हणाली त्याने तिथे झोपडी बनविण्यास सुरू केले. झोपडी बनवत असतांना त्याने आजूबाजूची जागा स्वच्छ करण्यास घेतली खूप मोठे गवत होते ते तो कापू लागला .गवत कापताना त्याला सापाने चावा घेतला. सापाचे विष त्याच्या सर्वांगामध्ये भिनले आणि तो जागेवरच मृत झाला.
इकडे त्याची बायको प्रसूत झाली तिला पुन्हा पुत्र झाला .तीने संपूर्ण रात्र ती दोन्ही मुलांना कुशीत घेऊन घालविली .तिच्या मनात वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या विचारांनी ती त्रस्त झाली.रात्रभर पाऊस सुरूच होता. सकाळ झाली, तिला वाटले आपला पती आपल्याला सोडून तर ते गेला नसेल. ती मुलांना घेऊन आपल्या पतीला शोधण्यासाठी इकडे तिकडे जंगलात भटकत असता तिला एके ठिकाणी तिच्या पतीचा मृतदेह दिसला ती खूप घाबरली दुःखावेग तिला आवरेना ओकसाबोक्शी रडू लागली. तिने स्वतःला सावरत गावकऱ्यांच्या मदतीने त्या मृतदेहाची अंतिम क्रिया आटोपल्यावर ती तशीच मुलांना घेऊन तिच्या आईबापाकडे निघाली पुढे जाता जाता पावसामुळे नदीला पूर आला होता .आणि तिला ती नदी ओलांडून जायचे होते पोटातअन्न नाही तरी दोन मुले जवळ होती तरी तिने नदी पार करण्याचे धाडस केले. मोठया मुलाला अलीकडच्या तीरावर ठेवून धाकटयाला पलीकडच्या तीरावर घेऊन गेली. आणि तिथे एका चिध्यांच्या बिछान्यावर त्याला झोपलवले. आणि ती मोठया मुलाला घेऊन येण्यासाठी मागे परत फिरली. ती त्या नदीच्या मध्यभागी आली आणि तिने मागे वळून लहान बाळाकडे पाहिले तर एक ससाणा त्या बालकाला पकडण्यासाठी येत होता तिने जोराने हात हलवूनत्या ससाण्याला हुसकावु लागली ,पळवू लागली हातवारे करू लागली .पण त्यामुळे आई आपणास बोलवत आहे असे मोठया मुलाला वाटले आणि तो आईकडे जाण्यासाठी रांगत रांगत नदीकडे गेला आणि नदीत उडी टाकली आणि तो वाहून गेला.ती मोठमोठ्याने ओरडू लागली.रडू लागली इकडे तिकडे धावू लागली, किंकाळ्या मारू लागली तशीच ती लहान बालकाला वाचविण्यासाठी धावत असतांना ससाणा त्या लहान बालकाला उचलून घेऊन गेला. त्यामुळे ती अत्यंत शोकाकुल झाली .तिचा शोक वाढू लागला मानसिक तणाव निर्माण झाला.
दोघे पुत्र मेले,मेला माझा पती
असे मोठमोठ्याने म्हणत ती तशीच श्रावस्तीला येत असताना रस्त्यात एक मनुष्य ओळखीचा भेटला त्याने तिला सांगितले की,तुझ्या आईवडिलांच्या घराला आग लागली आणि तुझे आईबाप भाऊ इ.घरातील सर्व लोक त्यात मृत्यू पावले. त्यांचा अंत्यविधी आटोपुनच मी आलो आहे श्रावस्तीच्या बाहेर स्मशानात त्यांची प्रेते जळत आहेत .हे ऐकून ती अतिशय रडू लागली तिच्या मनावरचा ताबा सुटला आणि ती वेड्यासारखी करू लागली. जमिनीवर कोसळली अंगावरचे कपडे फाडून टाकले आणि बडबडत निघाली .
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
पाली भाषा
दोघे पुत्र मेले,
मेला माझा पती
आईबाप जळती, बंधुसह
उभो पुत्ता कालकता,
पन्थे मयह्ह पती मतो!
माता पिताच भाता च,
एकचित्तकस्मिड्यहरे!!
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
मराठी अनुवाद
दोन्ही पुत्र मेले मार्गात
माझा पती मेला.
आईबाप आणि भाऊ
एकाच चितेवर जळाले.
अशा परिस्थितीत ती नागडी उघडी भटकत होती. तिला कोणी कपडा दिला तर तो फाडून त्याच्या चिंध्या करी आणि म्हणून लोक तिला”पटाचारा”या नावाने बोलू लागले.
एक दिवस भगवान बुद्धांचे प्रवचन जेतवनात धम्मराजीक स्तुपात सुरु होते. ‘पटाचारा’ तेथे आली आणि उभी राहिली. भगवान बुद्धांनि आपल्या मैत्रीपूर्ण भावनेने तिच्याकडे लक्ष दिले. भगवंत तिला म्हणाले,”भगिनी ..भगिनी.. तुझं लक्ष विचलित आहे त्याला एकाग्र कर.हे तथागतांचे मधुर शब्द तिने ऐकल्याबरोबर तिच्या मनात
एकदम लज्जा उत्पन्न झाली. ती पटकन खाली बसली.
जवळच एक मनुष्य उभा होता त्याने त्याचे उपरणे तिच्या अंगावर टाकले. ते उपरणे तिने लज्जा झाकण्यासाठी नेसले आणि धम्म श्रवण करू लागली.
भगवंत आपल्या प्रवचनात पुढे म्हणाले.”पुत्र, पिता किंवा भाऊ आपले रक्षण करू शकत नाहीत. ज्यांचे आप्तांकडून संरक्षण होत नसते हे ओळखून शहाण्या स्त्री पुरुषांनी शील, सदाचार, आणि सद्गुण धारण करावेत. आणि शुद्ध जीवनप्राप्ती साठी निर्वाणगामी मार्ग अवलंबन करावे.”
भगवान बुद्धांच्या उपदेशाने तिच्या मनावर फार परिणाम झाला तिने भगवंतांना अभिवादन केले. ती अतिशय लज्जित झाली. नम्रता धारण करून ती भगवंतांना शरण गेली. तिने भिक्षुणी संघात प्रवेश करण्याची विनंती केली व भगवंताने”पटाचारा “ला भिक्षुणी संघात दीक्षा दिली ती भिक्षुणी झाली. पटाचाराने चिवरचा सन्मान केला शुद्ध आचरणाने
अर्हंत पद मिळविले. भिक्षुणी संघात तिला विनयधर भिक्षुणीचे अग्रस्थान मिळाले पटाचाराने धम्माचा प्रचार प्रसार केला. व पाचशे स्त्रियांना तिने दीक्षा देऊन
भिक्षुणी बनविले.
!जयभीम! !!जयभारत!! !!!नमोबुद्धाय!!!