उजाड राणी किमया केलीस मोठी
भीमा तूज प्रणाम कोटी कोटी
तव करुणेचे मेघ वर्षले
तृप्तिने वृतरान हर्षले
सजीव झाली दुर्लक्षित ही श्रुष्टि
भीमा तूज प्रणाम कोटी कोटी
बहरून आले हे वन उपवन
फुलकीत झाले शोषित तनमन
दान असे की पडे अपुरी ओटी
भीमा तूज प्रणाम कोटी कोटी
भीम जगत हे असे सुशोभित
पाहून होती अवघे स्तंभित
शूळ परंतु उठे खलांच्या पोती
भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी
हे शिल्पकारा नव जगताच्य
वारसदारा तथागताच्या
गौरव राहील सदा विनय च्या ओठी
भीमा तूज प्रणाम कोटी कोटी
उजाड राणी किमया केलीस मोठी
भीमा तूज प्रणाम कोटी कोटी