भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे, महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान ज्यांनी इयत्ता दहावीच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीत 90% किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. उच्च व्यावसायिक शिक्षणाच्या पूर्व तयारीसाठी बार्टीच्या माध्यमातून याची सुरुवात करण्यात आली आहे.

21 जून 2021 रोजी झालेल्या बार्टीच्या प्रशासकीय मंडळाच्या 30 व्या बैठकीत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना” या नावाने योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार, 2020-21 मध्ये, महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गात 10वी उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ता यादीत 90% किंवा त्याहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक रु. 1,00,000/- अनुदान वितरीत केले जाईल. ही योजना शैक्षणिक वर्ष मार्च 2021 पासून लागू केली जाईल इयत्ता 11 वी आणि 12 वी साठी बक्षीस रक्कम (प्रति विद्यार्थी) रक्कम रु. 1,00,000/- x 2 वर्षे (नुसार) = रक्कम रु. 2,00,000/-

 • पुरस्काराची रक्कम

इयत्ता 11 वी व 12 वी साठी (प्रती विद्यार्थी ) रक्कम रु .1,00,000/- X 2 वर्ष (प्रमाणे) = रक्कम रु.2,00,000/-

 • सदर योजनेचे उद्दिष्ट

MH-CET, NEET,JEE, मेडिकल इ. सारख्या परीक्षेच्या पूर्व तयारी साठी अनुसूचित जातीतील गुणवंत तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे.

 • शिष्यवृत्तीसाठी अवलंबिण्यात येणारी कार्यपद्धती
 1. सदर योजनेकरिता पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील 10 वी मध्ये 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या गुणवत विद्यार्थ्यी/ विद्यार्थ्यांचे पालक याचेकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.
 2. सदर योजनेकरिता अर्जाचा नमुना व योजनेची माहिती बार्टी कार्यालयाच्या संकेतस्थळावर PDF स्वरुपात उपलब्ध आहे.
 3. बार्टी संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना Download करून अर्जदार विद्यार्थी / पालक यांनी भरून सदर अर्ज हा बार्टी मुख्य कार्यालयास खालील पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवावा. (कार्यालयाचा पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, 28, राणीचा बाग पुणे-411001).
 4. अर्जासोबत आई-वडील / पालकांनी द्यावयाचे स्व घोषणापत्र व मुख्याध्यापक यांनी द्यावयाचे शिफारस पत्र सादर करणे अनिवार्य आहे.
 5. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे/ पुरावे उदा. गुणपत्रक, शाळा सोडण्याचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रांच्या वाचनीय छायांकित (झेरोक्स ) प्रती साक्षांकीत करून सोबत जोडाव्यात.
 6. योजने अंतर्गत प्राप्त अर्जांची छाननी बार्टी कार्यालय स्तरावरुन करण्यात येईल.
 7. योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल व पुढीलप्रमाणे योजनेचा लाभ देण्यात येईल.
  1. योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांना प्रथम हप्ता रु. 50,000/- इतकी रक्कम सबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर RTGS द्वारे जमा करण्यात येईल.
  2. योजनेतील उर्वरित तीन हप्ते सहा महिन्याचा कालावधी नुसार देण्यात येतील ,त्याकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यास इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये होणाऱ्या सहामाही/वार्षिक परीक्षेत किमान 75% गुण मिळविणे आवश्यक आहे. (भाषा विषयांचे गुण वगळून)
 • आवश्यक कागदपत्र
 1. अर्जाचा नमुना.
 2. विद्यार्थ्याचा SSC बोर्ड (इ.10) चे मार्कशीट. (शाक्षांकित प्रत )
 3. विद्यार्थ्याचा SSC बोर्ड (इ.10) चे शाळा सोडल्याचा दाखला. (शाक्षांकित प्रत )
 4. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला विद्यार्थ्याचा /वडीलांचा जातीचा दाखला. (शाक्षांकित प्रत )
 5. सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा तहसीलदार तथा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला विद्यार्थ्यांच्या पालकांचा/आई-वडील यांचा उत्पन्नाचा दाखला.(मूळ प्रत)
 6. विद्यार्थ्याचा रहिवासी दाखला.(शाक्षांकित प्रत )
 7. विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँक खाते झेरॉक्स प्रत.( शाक्षांकित प्रत )
 8. आई –वडील / पालकांचे विहित नमुन्यातील स्व घोषणापत्र.
 9. विहित नमुन्यातील मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र किंवा शिफारसपत्र.
 10. कुटुंबाचे पिवळे रेशनकार्ड.(असल्यास प्राधान्य)
  • प्रोत्साहनपर पुरस्कार शिष्यवृत्ती चे निकष
   1. या योजनेचा लाभ हा शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षापासून पुढील वर्षाकरीता लागू राहील.
   2. विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी तसेच अनुसूचित जातीतील प्रवर्गातील असणे अनिवार्य.
   3. सदर प्रोत्साहनपर पुरस्कार शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थीचे आई-वडील / पालक दारिद्र्य रेषेखालील असणे किंवा त्यांचे वार्षिक उत्पन्न रक्कम २,५०,००० /-(अक्षरी दोन लाख पन्नास हजार रुपये) पर्यंत असणे बंधनकारक आहे.
   4. सदर योजनेचा लाभ हा विद्यार्थ्यांनी पुढील व्यावसायिक शिक्षणाची (MH-CET/NEET/JEE. इत्यादी) पूर्व तयारी करणे करिता देण्यात येत असल्याने विद्यार्थ्याने इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे.पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
   5. योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांना प्रथम हप्ता रु. 50,000/- इतकी रक्कम सबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर RTGS द्वारे जमा करण्यात येईल.
   6. योजनेतील उर्वरित तीन हप्ते सहा महिन्याचा कालावधी नुसार देण्यात येतील ,त्याकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या इयत्ता 11 वी व 12 वी महाविद्यालयीन वर्गातील उपस्थिती किमान 75% व त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच सदर विद्यार्थ्यास इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये होणाऱ्या सहामाही/वार्षिक परीक्षेत किमान 75 % गुण मिळविणे आवश्यक आहे. (भाषा विषयांचे गुण वगळून)
   7. पालकांचा उत्पन्नाचा दाखला , गुणपत्रक ,जातीचा दाखला इ. पुराव्यांची आवश्यकता वाटल्यास चौकशी केली जाईल.
   8. अर्जामध्ये खोटे, बनावट, दिशाभूल करणारे पुरावे /कागदपत्रे सादर केल्यास विद्यार्थ्यास सदर योजनेकरिता अपात्र ठरविण्यात येईल व योजनेचा लाभ दिला असल्यास सदर लाभ वसूल करण्यात येईल.

टिप :

योजनेसाठी प्राप्त झालेले अर्ज ,उपलब्ध निधी तसेच मा.नियामक मंडळाच्या निर्देश्नुसार सदरील योजनेची पुढीलप्रमाणे अंबालबजावणी करण्यात येईल.

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?