अरे सागरा, अरे सागरा,
भीम माझा येथे निजला, शांत हो जरा
दिनांसाठी कष्ट साहिले, माझ्या भीमाने
हक्क दिले मिळवुनी आम्हा, अति श्रमाने
सोडुनी ही गेली गाई, आपुल्या या वासरा
अरे सागरा
पाहून ऐट त्यांची, वैरी मनी लाजं
घटनेचा शिल्पकार, माझा भीमराज
दीप विझला, नाही आजला,आता चमकणारा
अरे सागरा
बौद्धमय करीन भारत, हीच मनी आस
आनंदाने ठेवीन मी, या समाजास
स्वप्न तुटले डोळे मिटले, आता ना सहारा
अरे सागरा
गेला सोडून अम्हा, पिता भीमराज
कल्याणकर्ता आमचा, राहिला ना आज
सोडुनी तो दुःखहर्ता, आजला या लेकरा
अरे सागरा