आम आदमी विमा योजना

योजनेचे नाव
आम आदमी विमा योजना

योजनेचा प्रकार
केंद्र पुरस्कृत योजना

योजनेचा उददेश
विमा संरक्षण व शिष्यवृत्ती

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव
सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.

योजनेच्या प्रमुख अटी
ग्रामीण भागातील 18 ते 59 वयोगटातील भूमिहीन शेतमजूरांना तसेच 2.5 एकर पेक्षा कमी बागायती व 5 एकर पेक्षा कमी जिरायती शेतजमीन धारण करणाऱ्यांना या योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. वार्षिक विम्याचा हप्ता रु.200/- इतका असून केंद्र शासनामार्फत रु.100/- व राज्य शासनामार्फत रु.100/- इतका विम्याचा हप्ता भारतीय आयुर्विमा महामंडळाला देण्यात येतो.

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप
या योजनेंतर्गत खालीलप्रमाणे घटना घडल्यास लाभार्थ्यांच्या वारसास / लाभार्थ्यास रक्कम देण्यात येते.
नैसर्गिक मृत्यू – रु. 30,000/-
अपघाती मृत्यू – रु.75, 000/-
अपघातामुळे कायमचे अपंग – रु.75, 000/-
अपघातामुळे दोन्ही डोळे वा दोन्ही पाय गमावल्यास – रु.75, 000/-
अपघातामुळे एक डोळा वा एक पाय गमावल्यास – रु.37, 500/-
या योजनेंतर्गत लाभार्थ्याच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना रु.100/- प्रतिमहा प्रति विद्यार्थी शिष्यवृत्ती देण्यात येते.

अर्ज करण्याची पध्दत
अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो

योजनेची वर्गवारी
विमा संरक्षण व शिष्यवृत्ती

संपर्क कार्यालयाचे नाव
जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?