क्रांती आणि प्रतिक्रांती

“क्रांती आणि प्रतिक्रांती” या ग्रंथातुन सुध्दा बाबासाहेबांनी आर्य हे विदेशी होते ही काल्पनिक मतप्रणाली नाकारली आहे… बाबासाहेबांनी या विषयाला घेवुन “शुद्र पुर्वी कोण होते?” आणि “अस्पृश्य मुळचे कोण?” या ग्रंथातुन अधिकाअधिक स्पष्टीकरण करुन या काल्पनिक आणि भ्रमित करणा-या कल्पनेचे खंडन-मंडन केलेले आहे… मात्र तथाकथीत मुलनिवासीवादी लोक हे बाबासाहेबांच्या या ग्रंथातील विचारांना नाकारतांना दिसतात… उलट बाबासाहेब हे कसे “आर्य हे विदेशी होते…” हे बाबासाहेबांच्या माथी जबरदस्तीने मारण्याचा फालतु खटाटोप करताना दिसत आहेत… त्यांना “शुद्र पूर्वी कोण?” आणि “अस्पृश्य मुळचे कोण” या बाबासाहेबांच्या ग्रंथातुन त्यांच्या भ्रामक कल्पनेला पोषक असे बाबासाहेबांचे विचार मिळाले नसल्याने हताश होवुन आता त्यांनी “क्रांती आणि प्रतिक्रांती” या पुस्तकाकडे मोर्चा वळविलेला आहे. आता ते बाबासाहेबांच्या”क्रांती आणि प्रतिक्रांती” या ग्रंथाचा वापर करुन तसेच बाबासाहेबांच्या एक दोन ठिकाणी दिलेल्या भाषणातील संदर्भ देवून बाबासाहेब हे कसे या भ्रमित सिध्दांताचे समर्थक होते हे सिध्द करण्याचा प्रयत्न करीत आहेत… पण मी या ठिकाणी सांगु इच्छितो की बाबासाहेबांनी “क्रांती आणि प्रतिक्रांती” या ग्रंथातुन हा सिध्दांत खोडूनच काढलेला आहे… हे सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे… हे मुलनिवासीवादी मुजोरी करुन म्हणतात की, बाबासाहेबांनी या सिध्दांताचे समर्थन केले आहे…  मी हा ग्रंथ वरवरुन वाचलेला नाही तर चिकित्सक बुध्दीने वाचलेला आहे… या ग्रंथात सुध्दा बाबासाहेबांनी ही भ्रामक कल्पना नाकारली आहे.. त्यामधील बाबासाहेबांचे संबंधित विषया संदर्भात विचार मी जसेच्या तसे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे… ते वाचल्या नंतर मुलनिवासी हे कसे बाबासाहेबांच्या विचारांचे विद्रुपीकरण/प्रदुशीकरण करत आहे हे स्पष्त होईल…

१) बाबासाहेबांच्या या ग्रंथात “राजहत्या किंवा प्रतिक्रांतीचा जन्म ब्राम्हणवादाचा विजय” या प्रकरणात म्हणतात ” भारताच्या इतिहासाची सुरुवात, भारतावर आर्याचे आक्रमण, त्यानी भारतात आपले वस्तीस्थान बनवणे आणि आपली संस्कृती तेथे स्थापन करणे येथुन होते असे मानले जाते. आर्यांचे गुण काहीही असोत, त्यांची संस्कृती, त्यांचा धर्म, त्यांची समाजव्यवस्था काहीही असो; पण आपणास त्याच्या राजकीय इतिहासाचे फार कमी ज्ञान आहे हे निश्चित. आर्य हे अनार्यापेक्षा श्रेष्ठ होते असा दावा केला जातो. परंतु आर्यानी आपल्या राजकिय इतिहासाबाबत बोलण्यासारखे फारसे काही ठेवले नाही हे खरे आहे. भारताचा राजकिय इतिहास नाग नावाच्या अनार्याच्या उदयापासून होतो. हे नाग राजे फार शक्तिमान होते. त्यांना आर्य जींकू शकले नाहीत. आर्यांना त्यांच्याशी शांतता करावी लागली व त्यांना आपल्या समान दर्जाचे मानावे लागले…..”

या बाबासाहेबांच्या विचारात “असे मानले जाते” यातुन काय बोध होतो तर इतिहासकारांनी मुख्यत: ब्राम्हण इतिहासकांनी आणि पाश्चिमात्य इतिहासकारांनी या सिध्दांताचे समर्थन केले आहे…आणि भारतीय समाजात सुध्दा ते प्रचलित होते… यामुळेच बाबासाहेबांनी “असे मानले जाते” असे म्हटले जाते… बाबासाहेब हे “आर्य हे विदेशी होते” या सिध्दांताचे समर्थक होते हे सिध्द होत नाही. ते प्रचलित मतांचा विचार पुढे ठेवतात बस एवढेच.

२)याच ग्रंथात बाबासाहेबांनी “शुद्र आणि प्रतिक्रांती” या प्रकरणात म्हणतात, “…. आर्यात अशी धारणा आहे की ते गो-या रंगाचे, सरळ नाकाचे व गौर वर्णाचे असून त्यांना याबद्दल अभिमान होता. दस्यू (अनार्य) लोकांबद्दल ही धारणा आहे की, ते येथील आदी निवासी (मुल निवासी) होते. त्यांचा रंग काळा आणि नाक चपटे होते. आर्यांनी भारतावर आक्रमण करुन अनार्य लोकांना पराजित केले व त्यांना आपले दास बनविले. दास या अर्थाने पराजितांना दस्यू हे नाव दिले गेले… ‘दस्यू’ हा शब्द दास या शब्दापासून बनलेला असून तो गुलाम या अर्थाने वापरला जातो. या सर्व धारणा चुकीच्या आहेत. असूर आणि सूर, दोघेही आर्य समुदायातील समान लोक होते. दोघांचाही पिता ‘काश्यप’ होता…..”

बाबासाहेबांनी “धारणा” हा शब्द वापरला आहे… आणि पुढे या सर्व धारणा चूकीच्या आहेत असे बाबासाहेब म्हणतात. याचा अर्थ बाबासाहेबांनी या धारणा नाकारलेल्या आहेत… त्यांनी स्वत:चे मत सांगीतले आहेत.

३) याच प्रकरणात बाबासाहेब म्हणतात, “आर्य कोणत्याही एका प्रजातीचे नाव नाही. तो काही लोकांचा समुह आहे. आर्य संस्कृती या नावाची एक विशिष्ट संस्कृती होती. ज्यामध्ये आर्याचे हितसंबंध गुंतलेले होते. जो व्यक्ती आर्यात सामील होण्याची इच्छा ठेवीत असे त्याला आर्य संस्कृती स्वीकारावी लागत असे. आर्यामध्ये काळ्या रंगाचे, चपट्या नाकाचे असे कोणत्याही प्रकारचे लोक नव्हते जे आर्याहून भिन्न होते.
वरील धारणा ‘वर्ण’ आणि ‘अनास’ या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेल्यामुळे तयार झालेली आहे. ‘वर्ण’ या शब्दाचा अर्थ रंग आणि ‘अनास’ या शब्दाचा अर्थ ‘नाक नसलेला’ असा करण्यात आला. हे दोघेही अर्थ चुकीचे आहेत. जाती या अर्थाने वर्ण आणि अन+आस=मुख किंवा आकृतीरहीत या अर्थाने अनास असा अर्थ लावला तर आर्य हे रंगाप्रती पूर्वग्रही होते याला कोणताही आधार सापडत नाही. वर्णासंबंधी प्रचलित धारणा ही चुकीच्या कल्पनांवर आधारलेली आहे.”

४) बाबासाहेब याच प्रकरणात म्हणतात, “दस्यू हे वेगळ्या प्रजातीचे नसून आर्य समुदायातील लोक होते. आर्यापेक्षा भिन्न संस्कृतीशी यांचा संबंध होता. आर्याच्या विरोधात्मक धोरणांशी यांचा संबंध आल्यामुळे आर्यांनी यांना वेगळे नाव दिले. म्हणून दास हे वेगळ्या प्रजातीचे नाव होते हे सिध्द करणे कठीण आहे. असे समजणे देखील चुकीचे आहे की आर्य आक्रमणकारी लोकांनी शुद्रांवर विजय प्राप्त केला.”

५) बाबासाहेब याच प्रकरणात पूढे म्हणतात, “प्रथम गोष्ट ही की या गोष्टीचा कोणताही पुरावा आढळत नाही की आर्यांनी भारता बाहेरुन आक्रमण केले व त्यांनी येथील लोकांना गुलाम केले.”

६)बाबासाहेब याच प्रकरणात पूढे म्हणतात, “याबाबतीत अनेक पुरावे देता येतील की आर्य हे भारतातीलच मुळनिवासी होते. या बाबीचे कुठलेही प्रमाण नाही की, आर्य आणि दस्यूंमध्ये युध्द झाले. वस्तुत: दस्यूंचा कुठलाही संबंध नाही.”

७) बाबासाहेब पुढे म्हणतात, “दुसरी महत्वाची गोष्ट ही की आर्य लोक हे शक्तीशाली असून त्यांनी अनार्यांना बळाच्या जोरावर अंकित केले. अशी कल्पना देखील करणे मुर्खपणाचे आहे कि कमजोर अशा आर्य लोकांनी शूद्रांवर विजय प्राप्त केले. दास व आर्य हे एकाच प्रजातिचे लोक असून सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न होते. दस्यू म्हणजे अनार्य या अर्थाने ‘आर्यापेक्षा वेगळी संस्कृती मानणारे लोक’ असा होतो. यांनी आर्यांना विरोध केला. शुद्र हे आर्यातीलच लोक असून आर्याच्या जीवनपध्दतीवर यांचा विश्वास होता. कौटील्याच्या काळापर्यंत शूद्रांना आर्य मानण्याची परंपरा भारतात कायम होती.

८) शूद्र हे आर्य समुदायातील, जन्मजात, अभिन्न आणि सन्मानित सदस्य होते. या गोष्टीचा उल्लेख यजुर्वेदातील एका श्लोकात आढळतो.

९) बाबासाहेब याच प्रकरणात म्हणतात, “संस्कारीत लोक ब्राम्हणांच्या बरोबरीचा दर्जा प्राप्त करु शकत. ते चारही वेद वाचू शकत.”

१०) बाबासाहेब याच प्रकरणात म्हणतात “अशाप्रकारे आर्य लोक आपल्या संस्कृतीमध्ये इतरांना व्रात्यस्तोम संस्काराद्वारे परिवर्तित करुन आर्य संस्कृतीच फैलाव करीत.”

११) पुढे बाबासाहेब म्हणतात, “असूर आर्यांच्या यज्ञसंस्कृती आणि चातुवर्ण्याच्या विरोधी होते. त्यंना देखील आर्य संस्कृतीत हराजोंच्या संख्येने परिवर्तीत करण्यात येत होते…”

वैगरे वैगरे….

उपरोक्त विचारांवरुन बाबासाहेब हे “आर्य हे विदेशी होते”, “त्यांनी दुस-या कोणत्यातरी प्रदेशातुन येवुन भारतावर आक्रमण केले?” या सिध्दांचे समर्थन करतात हे सिध्द होते काय? तर उत्तर नाहीच मिळते… दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी आक्रमण हा शब्द वापरलेला आहे… तो शब्द मोठ्या चतुराईने तथाकथित मुलनिवासीवादी वापरतांना दिसता… पण बाबासाहेबांनी हा अर्थ सांस्कृतिक आक्रमण या अर्थाने वापरलेला आहे… हे निश्चित आहे कारण आर्याची आणि अनार्यांची संस्कृती वेगवेगळी होती… आपली संस्कृती अनार्यावर थोपविण्यासाठी आर्यांनी सांस्कृतीक आक्रमण केले असा अर्थ या आक्रमनामागे बाबासाहेबांचा होता… त्याचा अर्थ आर्य हे कुठुन तरी बाहेरुन आले असा घेण्यात येवु नये. ते सांस्कृतीक आक्रमण या अर्थाने घ्यावे… बाबासाहेबांनी सांस्कृतीक हा शब्द उपरोक्त विचारात वापरलेला आहे. मुलनिवासीवाद्यानी अर्थाचा अनर्थ करु नये आणि बाबासाहेबांच्या विचारांना प्रदुषित करु नये एवढीच अपेक्षा… आपला काल्पनिक सिध्दांत थोपविण्यासाठी मुलनिवासीवादी मुलनिवासीवादाचा विरोध करणा-यांना/आर्य ब्राम्हण हे विदेशी होत या काल्पनिक सिध्दांच्या विरोध करणा-यांना आव्हान करत आहेत की त्यांनी “क्रांती आणि प्रतिक्रांती” हा ग्रंथ गांभीर्याने वाचावा. वरवर वाचु नये… आता मीच या ठिकाणी मुलनिवासीवाद्यांना आव्हान करतो की त्यांनीच हे कार्य प्रथम करावे…