सपासप भिमाच वार

दिलाय दनका मोडलाय मनका
मनूला केलय ठार अशी देखनी हाथी लेखनी
लखलखती तलवार
माझ्या भिमान… भिमान माय केलं सपासप वार

जन्मा आला गं भिमाईचा तो बाळ
तोच ठरला गं मनूचा करदनकाळ
निर्धार पक्का देऊन धक्का रुढी केली हद्दपार
माझ्या भिमान…भिमानं माय केलं सपासप वार

त्या महाडामधी मनुस्मृती जाळूनी केल संग्राम
हक्काच दिलय पानी
समोर ग्याला नाही तो भ्याला लडवाया झुंझार
माझ्या भिमान… भिमानं माय केलं सपासप वार

जवा भिमराया बोलाया राहायला उभा
गेली हादरून – हादरून गोलमेज सभा
बुद्‌धीचे तेज पाहून झाले भलेभले थंडगार
माझ्या भिमान… भिमानं माय केलं सपासप वार

किती गाशील रं संदिप त्यांची करनी
आणि नमले ते नमले बुद्धा चरनी
चरनी देवळ टाकली गोडी चाखली
दावलयं बुद्ध विहार
माझ्या भिमानं… भिमानं माय केलं सपासप वार