ओ…….
आले गेले किती या भूमीवरति
पुरून उरला तो साऱ्यांना घटनापती
भल्याभल्यांना एकटाच भिडला रं…
साऱ्या विश्वात लईभारी ठरला
माझा भिमराव र .. माझा भिमराव र …
पडितांचा पंडित ज्ञानी विद्वान
कोलंबियान दिला पहिला बहुमान
भारत देशाची त्याने घटना लिहून
लोकशाहीच र आम्हा दिल वरदान
ओ ज्ञानाचा तो धनी होता स्वाभिमानी
नाही झाला कोनी माझ्या भिमावानी,
उंच यशाच्या त्या शिखरावर चढला रं…
साऱ्या विश्वातर लईभारी ठरला माझा भिमराव र..
जय भिम…जय भिम….जय भिम…जय भिम….
दगडाच्या देवाला नाही आली आमची कीव
शूद्र म्हणून आमच्याशी केला भेदभाव
विषमत्तेच्या उरावर घातला रे घाव
दुबळ्याचा वाली झाला माझा भिमराव
हो-हो-हो त्याने केली खडी अशी किमया
न्यारी दुःख दिनाचे जानून त्या अंतरी
काळ्या मनूचा तो कायदा त्यानं मोडला र
साऱ्या विश्वात लईभारी ठरला माझा भिमराव र..
तोडला र बंद त्यान गुलामगिरीचा,
पाडला र मुडदा त्यानं दुष्ट या रूधिचा
उद्धार केला आमचा कैके पिढीचा
नेता नाही जगामध्ये भिमाच्या तोडीचा
ओ देतो सुरारीवाही पुन्हा होनार नाही
माझ्या भिमाची सर कोना येणार नाही
सारा समाज हा धम्माशी जोडला रं
साऱ्या विश्वात लईभारी ठरला माझा भिमराव र..
जय भिम …. जय भिम… जय भिम …..


