प्रत्येकाला धर्माची परीक्षा करून त्याची तपासणी करता आली पाहिजे. बाजारात सराफाच्या दुकानात आपण सोन्याचा दागिना खरेदीसाठी जातो. तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही हे पाहता की, हे सोने खरे आहे की खोटे? हे समजण्यासाठी कसोटीवर त्या दागिन्याला कस लावून पाहण्यात येतो. तसेच धर्माला कस लावून त्याची परीक्षा पाहिली पाहिजे. धर्मतत्त्वांची छाननी करून, सिद्धांत आणि आचार पडताळून आपण पाहूया की कोणता धर्म माणसाला सुखसमाधान देऊ शकेल?
~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर. २३ जून, १९५६, दिल्ली


