थांबवा जरा गाडी
हीच आहे भीमवाडी
समता आणि शांतीने
नांदती लाडी गोडी
निढळाने जमवूनि पैसा
बांधिले विहार
दिसते दुरुनी घुमट
चौरस्त्याच्या पार
मिळुनी समाज सारा
कष्ट करतो आळी पाळी
जाऊ चला या तिकडे
बुद्धाच्या विहारी
जमले हे सान थोर
नर आणि नारी
बघा समता सैनिक दल
फिरवितात लाठी काडी
धम्म वंदनाहि होते
सांज अन सकाळ
कुणी भीम बुद्धाला
अर्पि पुष्प माळ
मला ऐकू द्या आता
अशोकाची वाणी थोडी