Song: Dasha Pahuniya Jananchi
Singer: Prakash Patankar
दशा पाहिनुया जनाची, मला याद येते भिमाची
आता धावुनी पुढे येउनी, कोण देईल अश्रु पुसुनी
बनुनिया माय बाप आमुचा, भीम आम्हाला पुरवाईत होता
धाव घेउनी संकटाच्या समई, भीम आम्हाला सांभाडित होता
ठेवा थोड़ी ही जात अन राखा ईमान, खुर्ची साथी का बस्ता रुसुनी
भीम माउली सोडुनी जाता, कुणाची कुणाला जान नाहीं
स्वार्था पाई झगड़ती हे सारे जाती कोन्या थडीला भान नाही
नाही कोणाची साथ बसले करुनिया घात सारे आपुलेच भाऊ असुनी
कुठे वस्ति गरिबांची जड़ते , कुठे अपमान पूतद्यांचा होतो
कुणी आया बहिनिन्ना छळतो, कुणी संविधान बदलाया पाहतो
करण्या वैर्या वर मात यांना माराया लात कोण येइल कंबर कसुनी
अनुयाई खरा जो भिमाचा मारला जातो गोळी ने बिचारा
फ़क्त नेते बनुनीया फिरती लाठ्या पडल्या का यांचावर विचारा
हां नागनाथ आपली सारी हयात, करील जन सेवा गीते गाउनी
दशा पाहिनुया जनाची, मला याद येते भिमाची
आता धावुनी पुढे येउनी, कोण देईल अश्रु पुसुनी


