रविवार दिनांक २९ मे २०२२ रोजी दलित पँथर च्या स्थापनेला आज ५० वर्ष पूर्ण झालेमुळे, पँथरच्या झंझावाती कार्यास स्मरण करणेसाठी आयु. राहुल प्रधान यांनी नांदेड नगरी मध्ये भव्य अशा वैचारिक महोत्सवाचे आयोजन केले आहे.
या महोत्सवामध्ये देश विदेशातून अनेक पँथर चळवळीतले कार्यकर्ते आपली हजेरी लावणार आहेत. आपले विचार मांडणार आहेत.
अशा या शानदार महोत्सवासाठी भीम आर्मी चे संस्थापक अध्यक्ष भाईंची तोफ आज नांदेडात धडाडणार आहे.
चला तर मग दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव मिळून साजरा करूयात ! जय भीम!!
ब्लू प्राईड,
जागर अस्मितेचा,
दलित पँथर च्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाल्या निमिताने आदरणीय #राहुल #प्रधान यांनी आयोजित कार्यक्रमात टिपलेली काही छायाचित्र.
मुख्य पाहता हा दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे ज्याच्यात अमेरिका मधील #ब्लॅक पँथर या संघटनेचे संस्थापक body मधील लोक उपस्थित आहेत.
#Powe #to #people
या slogan सोबत त्यांनी समग्र उपस्थित जनसमुदायाला ऊर्जा दिली.
दलित पँथर चे निष्ठावंत ज.वी.पवार यांनी पँथर चा काळ आणि त्यांच कार्य अगदी पूरक शब्दात समजावलं.
परभणी जवळील एका गावात विहिरीवर अस्पृश्य बायकांची सावली पडली म्हणून गावात नग्न धिंड काढली इतका हृदयद्रावक क्षण सांगितला,
अगदी च सगळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्या हे ऐकून आणि त्या दर्मियान आपसूक त्या तरुणांमध्ये दलित पँथर ची चेतना निर्माण झाली आणि मग चळवळ सुरू झाली.
ब्लॅक पँथर ही अमेरिका मध्ये सुरू होती आणि त्या संघटनेला प्रेरित होऊन इकडे दलित पँथर सुरू झाली.
पुढं बोलताना ज. वी.म्हणतात की काहीही उपलब्ध नसायचं प्रसारमाध्यम नसायचे तरीही इतकी हालाखीची परिस्तिथी असून सुद्धा फक्त अन्याय हा सहन करायचा नसतो तर त्याचा प्रतिकार करायचा असतो या आणि एका भावनेतून पँथर चा जन्म झाला.
उद्देश हा एक च अन्याया विरोधात लढा तो सुद्धा शस्त्रविरहीत..
पँथर राहुल दादा प्रधान यांचे शत शत आभार
पँथर जिंदाबाद
जयभीम
-नागसेन…