महाकवी नामदेव ढसाळ यांच्या कविता | Namdeo Dhasal Kavita

नामदेव ढसाळ हे मराठी साहित्यातील एक प्रमुख कवी, लेखक आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुण्यातील एका दलित समाजात झाला. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे दलितांच्या संघर्षाची मुखर अभिव्यक्ती केली आणि समाजातील विषमतेवर प्रखर टीका केली.

त्यांच्या कविता संग्रहांमध्ये **’गोलपिठा’**, **’मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले’**, **’तुझे बोट धरून चाललो आहे मी’** यासारख्या प्रसिद्ध कृतींचा समावेश आहे. त्यांच्या लेखनातून दलितांच्या जगण्याची वास्तविक चित्रे उभी राहतात.

नामदेव ढसाळ यांनी **दलित पॅंथर** या संघटनेची स्थापना करून दलितांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांचे साहित्य आणि कार्य मराठी साहित्यात एक नवीन दिशा आणि ऊर्जा निर्माण करणारे आहे. त्यांचा मृत्यू १५ जानेवारी २०१४ रोजी झाला, पण त्यांचे साहित्य आणि विचार आजही प्रेरणादायी आहेत.

नामदेव ढसाळ यांचा कविता संग्रह 
आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शनी (१९७६)
खेळ (१९८३)
गोलपिठा (१९७२)
तुझे बोट धरून चाललो आहे मी
तुही इयत्ता कंची (१९८१)
मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे
मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (१९७५)
या सत्तेत जीव रमत नाही (१९९५)
मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह)

सर्व काही समष्टीसाठी
बुद्ध धर्म: काही शेष प्रश्न
आंबेडकरी चळवळ
आंधळे शतक
गांडू बगीचा
निर्वाणा अगोदरची पीडा
चिंतनपर लेखन
दलित पॅंथर- एक संघर्ष (हे पुस्तक नामदेव ढसाळ यांच्या मृत्यूनंतर त्‍यांच्या पहिल्या मासिक स्मृतिदिनी, म्हणजे १५ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रकाशित झाले.)

कादंबरी
निगेटिव्ह स्पेस
हाडकी हाडवळा
उजेडाची काळी दुनिया

नाटक
अंधार यात्रा

महाकवी नामदेव ढसाळ  यांच्या कविता

महाकवी नामदेव ढसाळ यांची समाजस्थिती विषद करणारी एक कविता…

‘ तहाची कविता ‘

व्हा, रे ..आता शहाणे
शोधू नका ‘ बहाणे..
आपलीच ‘ लोक ‘हरली
आपल्यातल्या ‘ तहा ‘ ने…!

आपल्याच ‘ बहाद्दराने
केलिया ‘आपली ‘ दैना
आपल्या ‘लोकांविरोधी
आपलीच ‘ भिम सैना….!

आपल्यातूनी’ पळाला
शत्रूस ..तो ‘ मिळाला..
देई ऊलट ..आरोळी
‘ तुम्हा ‘ भीमच’ ना कळाला…!”

आपल्याच ‘ माणसाचं
चाले ‘ निराळं ‘ डोकं
आपल्याला’ पाडणारी
आपली ‘खट्याळ ‘लोकं..!”

अकलेचा ‘आलेख ‘आमच्या
कधीही सरळ’ ना “गेला
बापाच्या.. ‘विरोधात
मुलगाच ‘ऊभा’ केला…!”

परक्या ‘घरात ‘सत्ता
आम्हीच ‘देत’ गेलो
आपल्याच समाजाची
‘ मज्जाच ‘ घेत गेलो…!”

सतराशे’ साठ ‘आम्ही
अमुक ‘टमुक’ गटाचे ‘
‘कसू -कसून ‘ आटे
गेलेत.. रे..नटाचे….!”

दोरी’ जरी’ जळाली
तरी ‘ पिळ ‘ जात नाही
टिकाविना ..रिकामा
इथे ‘ ईळ ‘जात नाही..!”

सोडून द्या ते ‘पक्ष’
सोडा मनाचा’ हट्ट’
बांधा एकीची ‘मुठ’
आवळूनी घ्या रे ‘ घट्ट..

कळते बघा आम्हाला,
वळत ..कसे रे नाही…?
त्यांना दिव्याची “गाडी
तुम्हीच का ‘ पायी पायी…?”

आपलेच लोक झाले
आपलेच हाड ‘ वैरी..
झाडून आपल्यावरती
आपल्याच ‘पाच” फैरी…!”

आपलेच ‘ गार ‘ केले
आपल्याच माणसाने
गाऊन पुन्हा आपल्याच
पराभवाचे” गाणे…!”

– पँथर नामदेव ढसाळ

======================

पाण्याविना समाज माझा
जेव्हा तडफडून मरत होता ,
सांगा हिंदुत्वाद्यांनो ,
तेंव्हा देव तुमचा काय करत होता?
सात कोटी दलितांचे ओझे जेव्हा
माझा भीम एकटा पेलत होता ,
तेव्हा डोंगर उचलणारा तुमचा हनुमान
काय झाडावरली माकडं झेलत होता?
बहुजनांच्या मुक्तीसाठी
जेव्हा भिम मनुस्मृती जाळत होता,
तेव्हा विश्वनिर्माता ब्रम्हदेव
तुमचा काय श्रावण पाळत होता .
त्या पुण्यातल्या भिमाकोरेगावमध्ये
जेव्हा एक महार ५६ पेशवे कापत होता
तेव्हा हाती सुदर्शन चक्र घेवून
श्रीकृष्ण,काय मेंढरं राखत होता ….
*महाकवी पद्मश्री पँथर नामदेव ढसाळ

 

————–

बोटाला सुई टोचली
जिव किती कळवळतो,
सूरे तलवारी खसाखस भोकसतात कस वाटत असेल..?
साधा चटका बसला मानुस किती घाबरतो,
साले जिवंत जाळून मारतात कस वाटत असेल..?
साधा पदर ढळला तर बाई किती शरमते,
साले नग्न दिंड काड़तात रे कस वाटत असेल..??
किती यातना,किती अपमान,किती वेदना,कस सोसत असेल..?
आमची हर एक पीढ़ी यांच्या अत्याचारी बलात्कारात कुथत आली,
परिवर्तनाच्या लढाईवर प्रतिगाम्यांचि औलाद निर्दयीपने मुतत आली…!
किती काळ हे असंच चालायच,किती काळ हे सार नीमूट झेलायच्…
आता ठरवलय…
ठेवलेल हत्यार खोलायच
माणसातल जनावर आरपार सोलायच …
करायची आहेत माणस आतून बाहेरून शुद्ध आणि जागवायचाय प्रत्येक मनात एक बुद्ध…

मी मारले सूर्याचे रथाचे सात घोडे
वाल्मीकीची कार्बनकाॅपी व्हायचे नव्हते मला
प्रपंचाच्या रगाडयाने केले मला पापाचे धनी
बायकोला म्हणालो–‘घे यातले थोडेसे वाटून’
तिने कानांवर हात ठेवले!
मुलालाही हीच वाक्ये म्हणून दाखविली
त्याने तर अंगाला पान सुद्धा लावुन घेतले नाही
वाल्मीकीने पापाचे ओझे वाहत वाहत अजरामर
आर्षकाव्य तरी लिहिले.
आणि मी?
मी जगण्याचे ओझे येथपर्यंत वाहत आणले.
हे जगण्याच्या वास्तवा
आता तुच सांग मी काय लिहू?

——–

वडारी दगडांना स्वप्न देतात ..
मी फुलबाजा पेटवतो …
बापाच्या आयुष्यात उतरू नये म्हणतात …
उतरतो … कानाकोपरा खाजवतो …
वडारी दगडांना फुलं देतात …
मी बेंडबाजा वाजवतो …
चार स्त्रियांच्या कमानी देहातून ….
कातळलेला उभा पारशी ओलांडतो …
बापाचा रक्ताळलेला पुठ्ठा पाहतो ….
अंधाराच्या गोन्दणीत ओठ भाजेपर्यंत सिगार ओढतो, उसमडतो …
वडारी दगडांना गरोदर ठेवतात …
मी थकलेले घोडे मोजतो …
स्वतःला टांग्याला जुंपून बापाचे प्रेत हाताळतो, जळतो ….
वडारी दगडांना रक्तात मिसळतात
मी दगड वाहतो …
वडारी दगडाचं घर करतात …
मी दगड डोक्यात घालतो …. मी दगड डोक्यात घालतो …

————–

मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला
दोन वर्ग शिकला नसंन
पण मोठा माज आला ……
पडुन होता पोयट्यासारखा
घोंगवत होत्या माशा
नवता कपडा आंगावर
खराब होती दशा
आरक्षणच्या माथ्यावर
खुप मोठा साहेब झाला
अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला…..
खुप होत्या पोथ्या
अन् खुप होते देव
दररोज वात लावुन
म्हणे मले सुखी ठेव
पहील्या वर्गापासुन
खुप सवलत घेत आला…..
अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला……..
नवतं त्याच्या पिढीत
कधी कुणी शिकलं
वावरात नारळ फोडुन
कधी नाही पिकलं
बांधावरचं पाणी
दिमाखानं घेत आला…..
अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला…..
ज्यानं केला राग त्याचा
त्याच्या मागं धावला
त्याच्या सांगण्यावरुन
फोटो नाही लावला
त्याचं जड पारडं
तु हलकं करत आला…
अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला…..
तुले नवतं माहीत
तु आहे कोण
कायदयाच्या नावानं
करत हात दोन
तु आता कायदा
लोकाले सांगत आला……
अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला …..
नाही आपली अक्कल
भिमावानी केली
त्याच्या एवढ शिकावं
हिम्मत नाही केली
दम नाही रक्तात
पण जातीभेद करत आला…..
अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला……
आतातरी सुधर
सोड आता गर्व
धर्मग्रंथाच्या नावानं
करुन दाखव सर्व
माहीत असुन तुले
मस्त नाटक करत आला ……
अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला ……

————

॰॰॥देशद्रोह॥॰॰

‘माणूसकीच्या रक्ताचा अभिषेक
घेणा-या शेंड्या ऊपटणे’, असेल देशद्रोह…
तर हो!
मी केलाय देशद्रोह!!

हो, मीच मारल्यात ढेराळलेल्या
भटशाहीच्या ढुंगनावर लाता
अन् मारत राहिन तिच्या
माकड हाडाचे मणके गळेपर्यंत…

आम्ही मागितला न्याय ,
तो देशद्रोह?
आम्ही म्हणालो ‘समता-बंधुता’,
तो देशद्रोह?
आम्हाला तुमचा धर्म नको
नकारतो तुमचे नपुसक देव,
देशद्रोह?
आम्ही म्हणतो ‘चला एक होऊ, जाती तोडू’
तोहि देशद्रोह?

तुमच्याकडे नेहमीच असते ‘हाफ चड्डी’
झाकायला तूमच्या कंडाळ संस्कृतिची लाज
तूमच्या मार्मिक भाषेला असतो
‘धेड – लांडे’ शब्दांचा साज…

तूमच्या छिनाल भेजातून
प्रसवणारा प्रत्येक विचार तूमची देशभक्ती असते?
तुम्ही मारता ‘सत्यधर्माचे’ पहारेकरी,
देशभक्ती?
तुम्ही काडता नथुरामी गेंड्यांचे जुलुस,
देशभक्ती?
तुम्ही जाळता ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’ ,
देशभक्ती?

आमच्याकढे बोट दाखविणा-या
मनुवादी दलदलीतील गांडुळांनों!
जरा डोकावून पहा
तुमच्याच बोच्यातुन सुटते
देशद्रोहाची दुर्गंधी…!!
पँथर नामदेव ढसाळ🔷🔷🔹🔹