दरवर्षी 8 जानेवारी हा दिवस बौद्ध धम्मध्वज दिन मोठया उत्साहाने साजरा केला जातो. असे मानले जाते की , जेव्हा तथागतांना संबोधी प्राप्त झाली होती .तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये आभा उत्पन्न झाल्या होत्या .ज्याला बुद्ध साहित्यामध्ये बुद्धरश्मी असे म्हणतात.
त्या आभा सर्वप्रथम भिक्खू आनंद यांनी पहिल्या होत्या.
श्रीलंकेच्या अनागरिक देवमीत्त धम्मापाल महास्थविर गुणांनंद भदंत सुमंगल आणि बौद्ध विद्वान जी. डी. आर डीसेल्वा यांनी बौद्ध धम्मध्वज 8 जानेवारी 1880 मध्ये डिझाईन केले.
ज्याला पाली मध्ये षडरोशनी ध्वज असे म्हणतात .
धम्मध्वजामध्ये पाच रंग असल्यामुळे त्याला पंचशील ध्वज सुद्धा संबोधले जाते.
ज्यामध्ये प्रत्येक रंगाचा एक वेगळा अर्थ आहे.

म्हणजेच या निळ्या आकाशाखाली सर्व मनुष्य समान आहेत.

मध्यम मार्ग म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेला आर्याष्टांगिक मार्ग ,जो उत्कृष्ट जीवन जगण्याचा सरळ आणि सोपा मार्ग आहे.




!जयभीम ! !!जयभारत!! !!!नमोबुद्धाय!!!