साहित्यरत्न अण्णाभाऊंचे बाबासाहेबाप्रती असलेलं प्रेम

अण्णाभाऊनी त्यांची “फकिरा” ही कादंबरी डॉ आंबेडकराच्या झुंजार लेखणीला अर्पण केली होती. ६ डिसेंबर १९५६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरीनिर्वान झाले त्यावेळी आणि त्याच्यानंतर सगळ्या देशामधून, राज्यामधून, जिल्ह्यामधुन, तालुक्यामधुन आणि नगरा-नगरा मधून बाबासाहेबांना श्रध्दांजली देण्याचा कार्यक्रम होत होता.
अश्याच वेळी आपल्या महाराष्ट्रातील सगळे त्यावेळेचे ख्यातनाम गायक, ख्यातनाम कवी , शाहीर यांनी ठरवले कि आपण हि बाबासाहेबांना आदरांजली किंवा श्रद्धांजली म्हणुन एक कार्यक्रम ठेवायचा आणि प्रत्येकाने बाबासाहेबांना अभिवादनपद एक गाणं श्रद्धांजली म्हणून गायचे आणि गाण्याच्या रूपाने बाबासाहेबांना श्रद्धांजली द्यायची असे ठरवले.
त्या कार्यक्रमाची तारीख ठरली… अंधेरी मधला एक हॉल निश्चित झाला आणि कार्यक्रम वेळेत सुरु झाला. त्या कार्यक्रमाला वामनदादा कर्डक, भिकू भंडारे , गोविंद म्हशीलकर , प्रल्हाद दादा शिंदे , विठ्ठल उमप, विठ्ठल शिंदे, आणि अण्णाभाऊ साठे असे नामचीन बरेच गायक मंडळी उपस्थितीत होती.
या कार्यक्रमाला सगळेजण स्टेजवर बसून सगळी गायक मंडळी आणि शाहीर मंडळी स्वता:चे आप-आपले गाणे सादर करत होते. या सगळ्यांचे गाण सादर झाल्यानंतर शेवटी फक्त एकच गायक, एकच शाहीर राहिले होते आणि ते म्हणजे अण्णाभाऊ साठे… तर त्यावेळेस ख्यातनाम कवी, गायक वामनदादा कर्डक अण्णाभाऊंना बोलतात कि “आण्णा” तुला गाणे नाही बोलायचे का…,आणि तू तर गाणे पण लिहून आणले नाही मग तू बाबासाहेबांना गाण्याच्या रूपाने श्रद्धांजली कसा वाहणार गाणे कसा बोलणार…??
मग त्यानंतर अण्णाभाऊ साठे खिश्यातून पेन आणि कागद काढतात आणि त्यानंतर ते गाणे लिहायला सुरुवात करतात… आणि त्या लिखाणाची, त्या कवितेची, त्या गाण्याची सुरुवात आण्णाभाऊ “जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव” ह्या ओळीने करतात….. आणि ते गाणं सगळ्या देशात, संपुर्ण महाराष्ट्रात हे गाणं ऐवढ गाजतं कि त्या गाण्याला देशात कुठेच तोड नाही आणि सगळ्यांना हे गाणं हव हवेसे हे गान झाल आहे… सर्वाना हे गाणं जीवन जगण्यास प्रेरणा देतं. खाली ते गाणं देत आहे.
जग बदल घालुनी घाव…
जग बदल घालूनी घाव । सांगुनी गेले मज भीमराव ।।
गुलामगिरीच्या या चिखलात । रुतुन बसला का ऐरावत ।।
अंग झाडूनी निघ बाहेरी । घे बिनीवरती घाव ।।
धनवंतांनी अखंड पिळले । धर्मांधांनी तसेच छळले ।।
मगराने जणू माणिक गिळीले । चोर जहाले साव ।।
ठरवून आम्हा हीन अवमानीत । जन्मोजन्मी करुनी अंकित ।।
जिणे लादून वर अवमानीत । निर्मुन हा भेदभाव ।।
एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होऊनी चलबा पुढती ।।
नव महाराष्ट्रा निर्मुन जगती करी प्रगट निज नाव

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?