मोठ्या मोठ्यांची काढली वरात । Mothya Mothyanchi Kadhli Varat Bhimgeet Song Lyrics

Song: Mothya Mothyanchi kadhli varat
Singer: Prakash Patankar
Album: May bhumichya sathi mar

भीमराव माझा जन्मा आला हो …

भीमराव माझा जन्मा आला

जरि हो खालच्या थरात .. पण

मोठ्या मोठ्याची काढली वरात

 

महारांचा सुज्ञान पोरगा, सयाजी राजाला पटला हो

शिक्षणवृत्ति घेउन भिवा तो विद्या सागर नटला हो

अठरा विश्वे दारिद्र होते सुभेदारांच्या घरात हो… पण

मोठ्या मोठ्याची काढली वरात

 

गोलमेज़ ची ती परिषद बघता बघता ठनानली

माझ्या भीमाचे एकून शब्द, दुनिया सारी दनानली

बोलून गेला भीम तो हो… माझा आवेशाच्या भरात

मोठ्या मोठ्याची काढली वरात

 

सुज्ञानी हा समाज सारा नाव भिमाच घेतो हो

भारत भू चा इतिहास हा आज ही ग्वाही देतो हो

भीम असा विद्वान जाहला हो…या धरती च्या नरात

मोठ्या मोठ्याची काढली वरात

 

घेउनी शिक्षा देउनी दीक्षा, सद्ध्ममा ची साथ दिली

दिवा बनुनी प्रकाश मंजर गुलामी वर्ती मात दिली

वाहुनी गेल्या जुन्या रुधी त्या हो…नाग नदीच्या पुरात

मोठ्या मोठ्याची काढली वरात

 

भीमराव माझा जन्मा आला

जरिही खालच्या थरात .. पण

मोठ्या मोठ्याची काढली वरात

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?