Song: Kunku Lavila Raman
Singer: Sushma Devi
Music – Bapu Sathe
Majhya Bhimachya Navach Kunku Lavila Raman Lyrics
माझ्या भीमाच्या नावाचं
कुंकू लाविलं रमानं
कुंकू लाविलं रमानं, कुंकू लाविलं रमानं
असे मधुर मंजुळ वाणी
ऐका रमाईची कहानी
वागे घरात नेमानं
कुंकू लाविलं रमानं
नाही गेली आज्ञाबाहेर
कधी आठवलं ना माहेर
केला संसार दमानं
कुंकू लाविलं रमानं
नाही केली आशा सोन्याची
करी चिंता सदा धन्याची
ठेवी पतीचा सन्मान
कुंकू लाविलं रमानं
रमा उपवाशी राहिली
दीन दलितांची माऊली
नाव कमविलं श्रमानं
कुंकू लाविलं रमानं
* * * * *
आंबेडकरी चळवळीच्या अधिक माहिती विषयी आमच्या फेसबुक पेजला Like करा. – https://www.facebook.com/brambedkar.in/
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. –