“तुम्ही एक गोष्ट कधीही विसरता कामा नये आणि ती ही की, ‘शील आणि शिक्षण हे जवळ असल्याशिवाय मनुष्याला या जगात काहीच साध्य करून घेता येणार नाही.’ दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे ती ही की, आज तुम्ही स्वातंत्र्य व स्वावलंबन मिळविण्याकरिता लढा चालविला आहे; त्यात तुम्हास यशस्वी व्हावयाचे असेल तर तुम्ही बाहेरच्या माणसाच्या मदतीची अपेक्षा न करता परावलंबी जिण्यापासून अगदी अलिप्त राहिले पाहिजे. हे तुम्ही जर करणार नाही तर ध्यानात ठेवा, तुम्ही परत गुलामगिरीच्या गर्तेत पडाल.” ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. ११ फेब्रुवारी १९३६, अहमदनगर


