बाबासाहेब यांचे वडील जेव्हा मुंबई वरून घरी जायचे तेव्हा 2 दिवस लागायचे त्यांना आंबडवे ला जायला.
हा मुलगा जेव्हा घरासमोरील जागेत खेळायचा तेव्हा वाटलं नाही कि पुढील काळात जगात कर्तृत्वचा ठसा उमटवेल
बाबासाहेब यांच्या वर प्रथम Phd करणाऱ्या एलीनौर झेलियेट हे जेव्हा बाबासाहेब यांच्या घरी आंबडवे ला आल्या तर ते तब्बल 3 तास पायी चालत आल्या , बाबासाहेब यांचे कर्तृत्व पाहून त्यांचे डोळे हि पाणावले.
बाबासाहेब हे माता रमाई यांचे निधन झाल्यानंतर सतत रडत असायचे दरवाजा लाऊन कधी कधी जोरजोरात रडायचे , बाबासाहेब याना मग कार्यकर्त्यानी विचारले बाबासाहेब स्वतःला सावरा अस रडू नका , तेव्हा ते म्हणायचे मी रामू चे ऋण कधीच फेडू शकणार नाही , तिने माझ्या शिक्षणासाठी खूप काही केले, माझा संसार सांभाळला पण मी तिच्या साठी काही करू शकलो नाही ,
पुढे नातेवाईक सांगतात
कि बाबासाहेब परदेशात जेव्हा शिक्षणास गेले तेव्हा माता रमाई याना काही पैसे दिले तर काही स्वतः जवळ ठेवले आणि काही दिवासत ते पैसे सम्पले.
कुटुंबाला सुरवातीला 1 दिवस मग पुढे 5 5 दिवस उपवास होऊ लागला
काका म्हणतात
काही खारका जमवून माता रमाई त्या खारकाना ओले करून त्यात पाणी टाकून भाकर खात असे
हे खूप दिवस चालले मग इतका उपासमार झाला म्हणून माता रमाई यांनी बाबासाहेब याना पत्र धाढले कि बाबासाहेब तुम्ही काही करा पण पैसे पाठवा खूप हालत होत आहे.
त्या पत्राचा reply पाहून मी खूप स्तब्ध झालो
बाबासाहेब म्हणतात रामू माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, तुझ्याकडचे पैसे सम्पले तसे माझ्याकडचे पैसे हि कधीच सम्पले , मला हि इकडे उपाशी राहवे लागते कधी कधी तर पावाचा तुकडा पाण्याबरोबर खावा लागतो
बाबासाहेब यांचे उत्तर ऐकून रमाई हि भावनिक झाल्या पण संसार हा सांभाळायचा होता
रोज वरळी आणि परेल चा परिसर पाई चालून शेणी गौऱ्या विकून रमा आई उदरनिर्वाह करत इतके नवे तर बाबासाहेब याना काही पैसे हि पाठवत
(आज लोक युरोपातुन भारतात पैसे पाठवतात , तिकडे मजा मारतात )
पण इथे भारतातुन बाहेर गावी पैसे पाठवले जात होते
आणि एकी कडे आमच्या आईचे आणि दुसरीकडे माझ्या वडिलांचे अर्थात बाबासाहेब यांचे हाल होत होते
का कशासाठी?
या लाखो वंचित लोकांसाठी हे चालले होते, खूप हाल सोसले यांनी
हे बाबासाहेब आठवून जेव्हा जेव्हा आठवण येईल बाबासाहेब तेव्हा तेव्हा रडायचे….
मनात वाटले
आहे गाडी आमच्याकडे आहे 3 bhk फ्लॅट पण काय करायचे हे जिथे आमच्या या आई वडील ( बाबासाहेब आणि रमा आई) नाहीत
खरच वाटते कधी कधी भावनिक व्हायला
पण मिशन जारी रहेगा
नमन त्या माझ्या आई वडिलांना
अर्थात माता रमाई आणि बाबासाहेब यांना…
*🙏जय भिम ☸जय माता रमाई🙏*


