कन्यादान योजनेखाली नवदाम्पत्यांना अर्थसहाय्य (विजाभज)

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नांव कन्यादान योजनेखाली नवदाम्पत्यांना अर्थसहाय्य (विजाभज)
2. योजनेचा प्रकार राज्य
3. योजनेचा उद्देश महाराष्ट्रात अनुसूचित जाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील वेगवेगळया जाती, जमातीतील लोंकाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा कमी करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जाती/विमूक्त जाती/भटक्या जमाती/इतर मागासवर्ग / विशेष मागासवर्ग
5. योजनेच्या प्रमुख अटी वधु व वर हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असले पाहिजे

वराचे वय 21 वर्ष व वधुचे वय 18 वर्षपेक्षा कमी असू नये

जातीचे प्रमाणपत्र सक्षम व प्राधिकृत अधिका-याने दिलेले असावे

वधु-वर यांच्या प्रथम विवाहासाठी हे अनुदान अनुज्ञेय राहील

नवदांपत्यांतील वधू/वर यापैकी दोन्ही किंवा एक जण हे अनुसूचित जाती (नवबौध्दासह) विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह ) विशेष मागास प्रवर्गातील असावेत.

बाल विवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायदयांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग या दाम्पंत्य/कुटूंब यांचे कडून झालेला नसावा या बाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक

6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप महाराष्ट्रात अनुसुचित जाती (नवबौध्दांसह ) विमुक्त जाती,
भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह ) विशेष मागास प्रवर्गातील
आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील
सामुहिक विवाह सोहळयामध्ये सहभागी होऊन विवाह करणा-या
जोडप्यांना रु 10000/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते.
सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्या-या संस्था व
संघटनांना प्रत्येक जोडप्या मागे रु 2000/- असे प्रोत्साहनपर
अनुदान देण्यात येते.
या योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठी तथापि विधवा
महिलेस दुस-या विवाहाकरिता अनुज्ञेय आहे>
7. अर्ज करण्याची पध्दत संबधीत स्वंयसेवी संस्थेने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.
8. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा
9. संपर्क कार्यालयाचे नांव संबधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी
Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?