होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर | Hota To Baapacha Baap song lyrics

Song :- Hota To Baapacha Baap Majha Bhimrao Ambedkar
SINGER (गायक) :- Kadubai Kharat (Aai)
Lyrics (गीतकार) :- Dhamma Dhanve
Music (संगीत) :- Hiral Kamble
(DJ HK STYLE)
Producer :- Prem NandKumar Salve

आरे होता तो बापाचा बाप
माझा भीमराव आंबेडकर

दिलाय दणका एकच भारी,
मनुवाद्याच्या तोंडावर, जातीवाद्यांच्या तोंडावर

आरे होता तो बापाचा बाप
माझा भीमराव आंबेडकर

कोणापुढे ही झुकणार न्हाय
मी मोडेल पण वाकणार न्हाय

हे वाघाचं पिल्लू हाय
कोल्ह्या कुत्र्याला घाबरत न्हाय

या वाघ्याच्या छाव्या म्होरं
कुणी करेना नजर वर

आरे होता तो बापाचा बाप
माझा भीमराव आंबेडकर

राहिला उपाशी दिवसभर
राहिला पावाच्या तुकड्यावर

नेता होता असा खंबीर
लिहिली घटना ती अवघड

बुद्ध धम्माचं अशोक चक्र ,
लावलेय तिरंगा झेंड्यावर

आरे होता तो बापाचा बाप
माझा भीमराव आंबेडकर

माझ्या भीमानं कंबर कसून
शिकला वर्गाच्या बाहेर

माझ्या बापानं कंबर कसून
शिकला वर्गाच्या बाहेर

कामगिरी आली दिसून
गेलाय साऱ्याच्या मनात ठसून

धम्मा धानवे ने लिहलेय गाणं
खरात बाई ने गायले गाणं

आरे होता तो बापाचा बाप
माझा भीमराव आंबेडकर