चक्रवर्ती सम्राट अशोक

chakravartin ashoka samrat | ashoka samrat history | chakravarthy ashok samrat
जगप्रसिद्ध आणि शक्तिशाली भारतीय मौर्य घराण्याचा महान सम्राट, सम्राट अशोक यांचे पूर्ण नाव होते देवानंपिय्य अशोक मौर्य (राजा प्रियदर्शी, देवांचा प्रिय). त्यांचे शासन प्राचीन भारतात 269 इ.पु. ते 232इ.पु पर्यंत होते. मौर्य राजवंशातील चक्रवर्ती सम्राट अशोक यांनीअखंड भारतावर राज्य केले आणि त्याचे मौर्य साम्राज्य उत्तरेकडील हिंदकुशच्या सीमेपासून गोदावरी नदीच्या दक्षिणेस आणि पूर्वेस बांगलादेशपासून पश्चिमेस अफगाणिस्तान, इराणपर्यंत पसरले. आजच्या भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश, भूतान, व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला हाेता. म्यानमारच्या बहुतांश प्रदेशांवर सम्राट अशोक यांचे साम्राज्य व्यापलेले होते, हे विशाल साम्राज्य आतापर्यंतचे सर्वात मोठे भारतीय साम्राज्य एैतिहासीकनाेंद म्हणून राहिले आहे.
सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासातही सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. सम्राट अशोकांना ‘चक्रवर्ती सम्राट’ असे म्हणतात, चक्रवर्ती सम्राट म्हणजे ‘सम्राटांचा सम्राट’. जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट हाेऊन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे. असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील सम्राट अशोक हेच असे पहिले आणि शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही. सम्राट अशोकांनी अखंड भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले. आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळ पर्यंत तसेच नेपाळ, भूतान, इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. अत्यंत शूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक ही युद्ध हरले नाहीत. कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. त्यांच्या राज्याचे केंद्रस्थान ज्याला बिहार म्हणतात तो मगध होता, व आज पटणा म्हणून ओळखली जाणारी पाटलीपुत्र ही त्यांची राजधानी होती.
सम्राट अशोक त्यांच्या कार्यक्षम राज्यकारभारासाठी आणि त्यांच्या विशाल साम्राज्यातून बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी देखील ओळखले जातात. सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा आशिया आणि इतर सर्व महाद्वीपांमध्ये उपदेश केला. सम्राट अशोकांच्या संदर्भाचे खांब व शिलालेख आजही भारतात ब-याच ठिकाणी आढळतात. म्हणून सम्राट अशोकांची ऐतिहासिक माहिती कोणत्याही सम्राटाकडून किंवा राजांकडून मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. सम्राट अशोक प्रेम, सहिष्णु, सत्य, अहिंसा आणि शाकाहारी जीवन प्रणालींचे खरे समर्थक होते, म्हणूनच त्यांचे नाव इतिहासातील महान परोपकारी सम्राट म्हणून नोंदले गेले आहे.
कलिंगाच्या युद्धात झालेली मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले. सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरवला होता. राजा अशोक यांच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपऱ्यात सापडतात त्यामुळे राजा अशोक यांच्याबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे. सम्राट अशोकाने आपल्या प्रजाजनांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या शीलालेखातून काही राजाज्ञा दिलेल्या आहेत. राजा अशोक यांचे शिलालेख हे मौर्य इतिहासाचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. सर्वप्रथम ब्रिटिश अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांना राजा अशोक यांचे शिलालेख वाचता आले. ते अनेक भाषांचे अभ्यासक होते. राजाअशोकांचे शिलालेख हे ब्राम्ही,खरोष्टी आणि अरेमाइक या तीन लिपींमध्ये आढळलेले आहेत. त्यातील अनेक अभिलेख हे ब्राम्ही लिपीतील असून ते जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले, त्यातूनच या चक्रवर्ती सम्राटांच्या आयुष्याची आणि एकूणच मौर्य साम्राज्या विषयीची सखोल माहिती हीअभ्यासकांना मिळालेली आहे.राजाअशाेक यांनी आपल्या शिलालेखामध्ये स्वतःला ‘देवानाम प्रिय’ असे संबोधले आहे.
कलिंग युद्धानंतर त्याचे झालेले मनपरिवर्तन, त्यानी स्वीकार केलेल्या बौद्धधर्म, बौद्ध धर्माची तत्वे आणि एकूणच धर्मप्रसाराचे कार्य महामात्र यांची नेमणूक या सर्व घटनांचा उल्लेख हा शिलालेखात आलेला आहे. सम्राट अशोक हे या काळातील भारतातील पहिले चक्रवर्ती राजा होय. सम्राट याचा अर्थ ज्याचा रथ, घोडा चारही दिशांना कुणीही अडवू शकत नाही असा पराक्रमी शासक व विजेता होय. सम्राट अशोकानी प्रशासकीय संदर्भाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले. प्रशासनामध्ये महामांत्रा हे पद निर्माण करून धर्मप्रसाराला उत्तेजन दिले. आपल्या मुलांनादेखील धर्मप्रसारासाठी त्यांनी देशाबाहेर जाण्यासाठी प्रेरणा दिली. प्रजेच्या कल्याणाच्या हेतूने अनेक उपक्रम हाती घेतले. अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून लोकांना सावलीची व्यवस्था केली,रस्त्यालगत जागाेजागी पानवठे विहीरी बनवल्या,गावाच्या वेशीवर गावातील प्रवेशद्वारावर आैषधाचे रांजण बनवले जेणे करुन एखादी व्यक्ती ज्या आजाराने ग्रस्त आहे तीला त्या आैषधाचा विनामुल्य लाभ मिळेल,जनावरांचे दवाखाने बनवणारे पहिले राजे, अशा अत्यवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. मात्र राजा अशोकानंतर राज्याला योग्य उत्तराधिकारी न लाभल्यामुळे मौर्य साम्राज्याचा -हास घडून आला. विशाल आणि एकछत्री केंद्रीकृत राज्य उभारण्याचा प्रयत्न अखिल भारतीय स्तरावर सर्वप्रथम मौर्य सम्राट यांनी केला. यामध्ये चंद्रगुप्त आणि सम्राट अशोक यांचे कार्य खूप महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. राजा अशोक यांनी बौद्ध धर्माची शिकवण देताना लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीला चालना दिली. शांततेच्या मार्गाने कुठलेही राज्य जास्त काळ टिकू शकेल यावर त्याचा विश्वास निर्माण झाला. बौद्ध धर्माच्या प्रसाराला त्यानी चालना दिले. त्यासाठी शासकीय अधिकारी नेमले स्वतःच्या मुलांना त्यानी धर्म प्रसारासाठी पाठवले.
कलिंग युद्धाच्या दोन वर्षापूर्वी भगवान बुद्धांच्या मानवतावादी शिकवणुकीचा प्रभाव असलेले सम्राट अशोक बौद्ध अनुयायी बनले आणि त्यांच्या आठवणी चिरकाल।।टिकाव्या म्हणून त्यांनी नेपाळमध्ये त्यांच्या जन्मस्थळावर, लुम्बिनी मध्ये मायादेवी मंदिराजवळ, सारनाथ, बोध गया, कुशिनारा येथे अनेक स्थंभ उभारले . तसेच श्रीलंका, थायलंड, चीन आदी देशांत अजूनही बौद्ध मंदिरे, अशोका स्तंभ पाहायला मिळतात. थायलंडमध्ये सम्राट अशोक यांचे चार प्रतीकात्मक सिंह असलेले स्थंभ सापडले.
सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा प्रचार भारताव्यतिरीक्त श्रीलंका, अफगाणिस्तान, पश्चिम आशिया, इजिप्त आणि ग्रीस या देशात सुद्धा केला. सम्राट अशोक यांनी आपल्या संपूर्ण जीवनात एकही युद्ध गमावले नाही. सम्राट अशोकांच्या काळात 23 विश्व विद्यापीठे स्थापन झाली, त्यामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशीला, कंधार इत्यादी विश्वविद्यापीठे प्रमुख होती. परदेशातून बरेच विद्यार्थी या विश्वविद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी भारतात येत असत. ही विद्यापीठे त्या काळातील सर्वोत्तम विद्यापीठे होती. शिलालेख सुरू करणारा पहिला शासक सम्राट अशोक हे होते अशोक यांनी बौद्ध धर्माचे तत्त्व राज्य शासनप्रणालीत प्रथम लागू केले जे आजही कार्यरत आहे.
बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी त्यानी आपला मुलगा महेन्द व मुलगी संघमित्ता याना बाहेर देशात पाठविले. राजा अशोक यांचा मुलगा महेंद्र धम्म प्रचारात सर्वाञ यशस्वी होता. महेंद्रने श्रीलंकेचा राजा तिस्स यांना बौद्ध धर्मात दिक्षित केले आणि तिस्स यांनी बौद्ध धर्माला आपला राजधर्म बनवून राजा अशोक यांच्याद्वारे ‘देवनामपिय्य’ या उपाधीने स्वत: ला प्रेरित केले.
राजाअशोक यांच्या कारकीर्दीत पाटलिपुत्रात तिसरी बौद्ध संगीती आयोजित केले गेली होती, ज्याचे अध्यक्ष मोगली पुत्त तिस्स हे होते. या संगीतीमध्ये राजाअशोक यांचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा हे सुद्धा उपस्थित होते.
राजा अशोक यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लोकांच्या कल्याणासाठी साम्राज्याच्या सर्व साधनांचा उपयोग केला. त्यांनी बौद्ध धर्माच्या संरक्षण- संवर्धनासाठी खालील साधने अवलंबली –
(अ) धर्मयात्रा सुरू होणे,
(ब) राज्य अधिका-यांची नेमणूक,
(क) धर्म महापात्रांची नेमणूक,
(ड) दिव्य रूपांचे प्रदर्शन,
(इ) धर्म श्रवण आणि प्रवचन प्रणाली,
(ई) प्रसिद्धीची कामे,
(उ) धम्म लिपीची कोरीव कामे
(ऊ) विदेशात धर्मप्रचारक पाठविणे इ.
राजा अशोक यांनी बौद्ध धर्माचा प्रसार धर्मयात्रेने सुरु केला. अभीषेकाच्या 10 व्या वर्षी ते बोधगया येथे गेले. कलिंग युद्धानंतर आमोद-प्रमोदच्या भेटींवर बंदी घालण्यात आली होती. आपल्या अभिषेकच्या 20 व्या वर्षी ते लुंबिनी गावात गेले. त्यानी नेपाळ तराई येथे असलेल्या निगलिवा येथे कनकमुनीच्या स्तूपाची दुरुस्ती केली. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी त्याच्या साम्राज्यातील उच्च अधिका-यांची नेमणूक केली. तीन आणि सात स्तंभांनुसार, त्यांनी व्युष्ट, राजजुक, प्रांत आणि युक्त नावाच्या अधिका-यांना सार्वजनिक ठिकाणी जाऊन धर्म उपदेश करण्याचे आदेश दिले.
अभिषेकच्या तेराव्या वर्षा नंतर त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी “धर्म महापात्रा” नावाच्या पदाधिका-यांचा नवीन वर्ग तयार केला. विविध धार्मिक पंथांमधील वैर दूर करण्यासाठी आणि धर्म ऐक्य स्थापित करणे हे त्याचे कार्य होते.
सम्राट अशोक भगवान बुद्धांचे श्रद्धाळु अनुयायी होते. कलिंग युद्धांच्या संहारानंतर कोणत्याही शेजारील देशाला शत्रांने जिंकणार नाही अशी प्रतिज्ञा केली. कोणी आक्रमणकारी देशाच्या भुमीवर पाय ठेऊ नये म्हणुन ज्याप्रमाणे भगवंतांनी उपदेश केला होता त्याप्रमाणे साम्राज्याच्या सिमेवर किल्ले बनविले आणि चतुरंगी सेना स्थापित केली. शेजारील देशवासीय हे पाहुन भयभित झाले. त्यांची भिती दुर करण्यासाठी राजा सम्रट यांनी आपल्या सीमेवर एक शिलालेख रोवला. ज्यावर स्पष्ट कोरले होते की “सो अनुसोचन देवनपिअस विज्जिति क्लिगनि ।
-कलिंगवर विजय प्राप्त करुन देवानंप्रियला पाश्चाताप झाला आहे. त्याने अशी चुक परत न करण्याचा निश्चय केला आहे. आता शत्राव्दारा नाही, तर धर्माव्दारे विजय प्राप्त करु इच्छित आहे. धर्माव्दारे विजय प्राप्त करुन मला आनंद प्राप्त झाला आहे.
धन्य झाला असा धर्मविजयाचा विजेता. या विजयाने सम्राट शेजारील देशवासीयांचा पिढ्यांनपीढ्याचा ह्रुदय सम्राट झाले
आपल्या राजामध्ये झालेल्या ह्या धार्मिक परिवर्तनाने सम्राट अशोक राजाची प्रजा फार खुष झाली. राजाने बनविलेल्या सर्व स्मारकांना जनतेने सजविले. दिव्यांची आरास ( दीपोत्सव ) केली. हा आयोजन सोहळा दहा दिवस चालू होता. दहाव्या दिवशी राजा अशोकाने राजपरिवारासह भिक्खू मोग्गिलिपुत्त तिष्य यांचे कडून बुद्ध धम्म दिक्षा ग्रहण केली. धम्म दिक्षा घेतल्यानंतर अशोकाने प्रतिज्ञा केली की, यापुढे मी शस्त्राने नव्हे तर, प्रेम, शांती, व अहिंसा मार्गाने सर्व प्राणिमात्रांवर विजय मिळविन. या कारणाकरिता संपूर्ण बौद्ध समाज ह्या दिवसाला “अशोक विजय दशमी ” सण म्हणून साजरा करतात.
भंते निग्रोध यांच्या उपदेशा नंतर अश्विन शुद्ध दशमिला भंते उपगुप्त यांच्या हस्ते सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचि दीक्षा घेतली. धम्म दीक्षेच्या वेळी धम्मचक्र प्रवर्तनाय (अनुवर्तनाय नाही !) संकल्प उदघोषित करुन , बौद्ध धम्म अचारसंहितेवर आधारित दसहरा(दस + हरा पालीे शब्द “हरा “म्हणजे “घेवून जाणारा “) वैदिक धर्मापासून दूर बौद्ध धम्मकडे घेवून जाणारा अधिकृत दसकलमि जाहिरनामा म्हणजे दसहरा प्रजेसाठी लोकनीति व धर्मनीति म्हणून प्रसारित केला . हाच प्रजाधर्म, नितिधर्म , राजधर्म समजून सर्वानी त्यांचा आदर करावा अशी राजाज्ञा जाहिर केलि . या राजाज्ञा जिथे जिथे तथागताच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना घडल्या त्या ठिकाणी स्तम्भ उभरूंन त्या स्तंभावर शिलालेख रूपात कोरण्यात आल्या. अशा प्रकारे इ स पूर्व 254 पासून अशोक विजया दशमिचा दसहरा म्हणजेच त्याचाच अपभ्रंश दसरा म्हणून सण साजरा केला जाऊ लागला .
सम्राट अशोक यांनी प्रजेला उद्धेषुन जी राजाज्ञा रूपी नितितत्वे विविध अशोक स्तम्भावर कोरली ती तत्वे पुढील प्रमाणे…
1) धार्मिक स्थळी व कार्यक्रमात पशुहत्या किंवा पशुबळी न कारणे
2) चोरी , फसवणूक, लुबाडनुक ईत्यादी न करणे
3) परस्त्रीगमन , व्यभिचार न करणे .
4) खोटे न बोलणे, गैर व्यवहार न करणे .
5) सार्वजनिक व पवित्र स्थळी मद्यपान न करणे
6) नास्तिकपणा , सत्कार्य व मणुसकिचा तीटकारा सोडून देणे
7) व्यक्ति गुणांने श्रेष्ट मनावा , त्याच्या जातीने नव्हे .
8) वैर सोडून दिल्यानेच वैर शांत होते हे विसरु नये.
9) धर्मगुरुनि सांगितलेले बहुजन हिताय बहुजन सुखाय व सदाचार हे आपले आचरण विसरु नये .
10) निति नियमांचे पालन करण्यास अमृताचा लाभ , नाहीतर मृत्युशी गाठ हे विसरु नये .
अशा प्रकारे सदर राजाज्ञा द्वारे सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्मास राजाश्रय देवून धम्माचे पालन करने हे आपल्या राज्यात बंधनकारक केले !
सदर राजाज्ञाचा United Nation’s Declaration Of Human Rights ने आपल्या Manifesto (जहिरनाम्यात) समावेश केला आहे ही सर्व बौद्धांसाठी अभिमानास्पद बाबआहे !
(सन्दर्भ: Story of India – documentary by Michel Palin, BBC)
————- ————-
शासनकाळ : 269 ईसा पूर्व ते 232 ईसा पूर्व (40 वर्षे)
राज्याभिषेक : २७० ईस. पूर्व
पूर्ववर्ती : बिन्दुसार- पिता, चंद्रगुप्त मौर्य – आजोबा
उत्तरवर्ती : दशरथ मौर्य
जन्म : ३०४ ईसा पूर्व १३ एप्रिल, पाटलिपुत्र, पटना (बिहार)
निधन : २३२ ईसा पूर्व (72 व्या वर्षी, पाटलिपुत्र, पटना
पत्नी : असंधमित्ता, महराणी देवी, पद्मावती, कारुवाकी, तिष्यरक्षिता
संतान : महेन्द्र , संघमित्रा , तीवल , कुणाल, चारुमती, जल्लोक, कुस्तन , तिष्याष
पिता : बिंन्दुसार
माता : सुभद्रांगी (राणी धर्मा)
राजमुद्रा : अशोक स्तंभ
उत्तराधिकारी : सम्राट कुणाल मौर्य
🌹 सर्वांचे मंगल होवो 🌹
Source: from the facebook wall of Chandrahas Tambe

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?