बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक प्रसंग

“”बाबासाहेबांच्या आयुष्यात जळगाव येथे घडलेला एक प्रसंग…!””

जळगावला एके ठिकाणी बाबासाहेबांची सभा होती.
जिथे सभा असे बाबासाहेबांची त्या ठिकाणी बाबासाहेब आदल्या एक दोन दिवस मुक्कामी जात असत.
तसेच जळगावला सुध्दा मुक्कामी गेले होते.
जळगावला जिथे बाबासाहेब गेले होते.
त्या ठिकाणी आदल्या दिवशी गावकरयांचा काही कार्यक्रम होता.
त्या निमित्ताने गावकरींनी आसपासचया गावाचे मिळून जवळपास पाच हजाराच्या आसपास ब्राह्मण भटजींना जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता.
इंग्रजी राजवट असल्या कारणाने, तिथे इंग्रजी पोलीस अधिकारी सहित जवळपास 100 ते 150 पोलीसांचा ताफा होता.
बाबासाहेब त्या ठिकाणी गेले व बाबासाहेबांनी अजब चित्र तिथे पाहिले,
ते असे जिथे पांच हजार ब्राह्मणांचा भोजन समारंभ होता.
त्या ठिकाणी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच पोलीस होते.
आणि भोजन झाल्यावर गावकरी जिथे पत्रावळ्या टाकत होते.
त्या ठिकाणी सर्व पोलीसांचा ताफा होता.
कारण जिथे पत्रावळ्या टाकल्या जात होत्या त्या ठिकाणी.
150 ते 200 महारा मांग व् चांभाराचे लोक उष्ट भोजन खायला थांबले होते.
हे भयाण दृष्य पाहून बाबासाहेबांना राहवले नाही.
व त्यांनी पोलीस अधिकारीला विचारले, कि ज्या ठिकाणी पाच हजार पेक्षा जास्त लोक भोजन करित आहेत.
तिथे तुमचे फक्त मोजकेच पोलीस आहेत.
पण जिथे उष्ट खाण्यासाठी फक्त दिडशे ते दोनशे लोक आहेत.
तिथे तुमचा सर्व पोलीस ताफा कशासाठी आहे?
त्या पोलीस अधिकारीने बाबासाहेबांना उत्तर दिले.
कि जिथे पांच हजार पेक्षा जास्त लोक भोजन करित आहेत.
ते शांततेत चालू आहे.
पण उष्ट भोजन खाण्यासाठी जे महार मांग चांभाराचे जमले आहेत.
त्या लोकांमध्ये दरवर्षी या उष्ट खाण्यासाठी एक दोन खुन होत असतात.
त्या मुळेच तिथे सर्व पोलीस ताफा ठेवला आहे.
हे ऐकून बाबासाहेबांना फार दुख झाले.
व ते काही न बोलता तिथून निघून गेले.
आपली सभा केली.
पण त्या नंतर बाबासाहेबांनी असे कार्य केले.
कि आज महार मांग चांभाराचे घरी उष्ट अन्न उरते तर ते फेकून देतात कुत्रा मांजरांना टाकतात.
हे बाबासाहेबांचे कार्य होय.
पण दुर्दैवाने आजचे महार मांग चांभार बाबासाहेबांचे ऋण विसरले आहेत.
आणि आपल्याच मौजमजेत जगत आहेत.
पण लक्षात ठेवा.
त्याच बाबासाहेबांनी सांगितले आहे.
जो समाज आपला इतिहास विसरतो तो, समाज इतिहास घडवू शकत नाही.
मग इतिहास पुन्हा त्या समाजाला धडा शिकवलया शिवाय राहत नाही.

जय भीम..!