अप्रमादीचे पतन होत नाही.

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अप्रमादीचे पतन होत नाही_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अप्पमादरतो भिक्खु पमादे भयदस्सि वा ।_*

*_अभब्बो परिहानाय निब्बानस्सेव सन्तिके ॥_*

*_अर्थ – जो भिक्षु अप्रमादात आनन्द मानतो व प्रमादाला भितो, तो निर्वाणाजवळ जातो. त्याचे पतन होणे संभवत नाही._*

_श्रावस्ती जवळच्या निगम नावाच्या गावातील तिस्सस्थविर प्रव्रजित झाल्यापासुन नेहमी आपल्या गावातच पिण्डपाताकरिता जात असे. एके दिवशी भिक्षु बुद्धांस म्हणाले तो भिक्षु गृहस्थांमध्ये मिळून – मिसळून विहरतो, अन्यत्र भोजनाकरीता जात सुद्धा नाही. तथागतांनी त्याला बोलावुन विचारले – काय हे सत्य आहे, तू गृहस्थामध्ये मिळून – मिसळून विहरत असतो ? तो आपली बाजु मांडतांना म्हणाला – ” भन्ते ! मला जेथे शीळे वाळले मिळते, त्यातच समाधान मानतो, पुन्हा अन्यत्र भोजनाकरीता घरे धुंडाळत नाही. गृहस्थांमध्ये मिळून मिसळून काय साध्य करीन ? ” तेव्हा तथागत म्हणाले -_*’साधु “! भिक्षु !! तुझ्या सारखेच इतर भिक्षुंनी करावयास पाहिजे. अशा भिक्षुंचे मार्ग – फळा-पासून कधीच पतन होत नाही, तर तो निर्वाणाच्या अधिक जवळ जात असतो.”* याच संदर्भात त्यांनी पुढील गाथा म्हणाले._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन – महेश कांबळे_*

*_दिनांक :-२९/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद – अप्पमादवग्ग, अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼