ॐ मणि पद्मे हूँ

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_ॐ मणि पद्मे हूँ_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                   *_२४ फेब्रुवारी १९५६ रोजी बोधिसत्व बाबासाहेब यांनी संकलित केलेले एक छोटेसे पुस्तक मुळ मराठीमध्ये प्रकाशित केलेले, बुद्ध पूजा पाठ. ज्यामध्ये दैनंदिन व नियमित पूजापाठ यासाठी उपयोगी, त्रिशरण पंचशील, तीन रत्नांची वंदना, बुद्धपूजेसह रतनसुत्त, सर्व गाथा, मराठी मध्ये लिहिलेले आहे. या पुस्तकाची प्रस्तावना मराठीतून बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेली आहे. त्यात त्यांनी हा उल्लेख केला की, या पुस्तिकेतील सुत्त त्यांनी १९५० च्या श्रीलंकेच्या प्रवासादरम्यान एकत्र केले होते. या पुस्तिकेतील सुत्त बाबासाहेबांनी त्यावेळचे प्रसिद्ध गायक मास्टर कृष्णराव यांच्याकडून गाऊन घेतले होते. याची निर्मिती तत्कालीन प्रसिद्ध ग्रामोफोन कंपनी एच. एम. व्हि. ने केली होती. जे म्युझिक आर्काईव मध्ये आजही उपलब्ध आहे._*

               _*या पुस्तिकाला प्रदीप सतिकाबाई गायकवाड यांनी “बुद्ध आणि त्यांचा धम्म” “बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया” “समता सैनिक दल” यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशित केली. बोधिसत्व बाबासाहेब यांनी संकलित आणि स्वतः त्यांच्या जीवनात प्रकाशित केलेल्या या पुस्तिकेच्या शेवटी छोट्याशा शिर्षकात दिले आहे, “जप” व खाली तीन वेळा बोधिसत्व अवलोकितेश्वर याचे एक बौद्ध मंत्र छापले आहे.*_

*_ॐ मणि पद्मे हूँ_*

*_ॐ मणि पद्मे हूँ_*

*_ॐ मणि मद्मे हुँ_*

           _*या पुस्तिकेचे हिंदी भाषांतर आंबेडकर ज्ञान मंदिर, नागपूर याच्याकडून १९९७ मध्ये पुन्हा प्रकाशित केले, त्याचा अकरावा आणि शेवटचा भाग जा विधायक पंचशील असून जप या शिर्षकाखाली पुन्हा वरील मंत्र तीन वेळा छापला आहे ॐ मणि पद्मे हूँ….*_

            *_महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या बोधिसत्व बाबासाहेबांच्या संपूर्ण साहित्याच्या इंग्रजी आवृत्तीच्या सोळाव्या खंडात वरील पुस्तिका मुळ मराठी स्वरुपात जशीच्या तशी प्रकाशित केली आहे. ज्यामध्ये शेवटच्या अध्यायाचे शिर्षक जप आहे, त्या अंतर्गत बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा वरील मंत्र लिखित आहे – ॐ मणि पद्मे हुँ.._*

            _*बोधिसत्व बाबासाहेबांचा सर्वाधिक प्रसिद्ध ग्रंथ The Buddha and His Dhamma (मराठी आवृत्ती, बुद्ध आणि त्यांचा धम्म) १९५७ मध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीच्या शेवटी सुद्धा बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा वरील मंत्र तीन वेळा उल्लेखित करण्यात आला आहे – ॐ मणि पद्मे हुँ.. महापरिनिर्वाणाच्या दोन दिवस अगोदर, ४ डिसेंबर १९५६ रोजी बोधिसत्व बाबासाहेबांनी श्री. वी.एस. कर्डक यांना बौद्ध विवाह सोहळा, विधी बद्दल एक अतिशय संक्षिप्त पत्र लिहिले होते, त्याचा शेवट बाबासाहेबांनी या मंत्राने केला आहे. ॐ मणि पद्मे हुँ.*_

            _हे प्रामाणिक व अचूक संदर्भ सिद्ध करतात की, *बोधिसत्व बाबासाहेब करुणेचे बोधिसत्व अवलोकितेश्वराचा मंत्र जप करीत असत. ॐ मणि पद्मे हूँ, कारण या मंत्राला त्यांनी आपल्या पुस्तकांमध्ये “जप” या शिर्षका अंतर्गत दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध चळवळीचा इतिहास, या पुस्तकाचे लेखक श्री श्यामसिंह यांनी त्यांच्या पुस्तकात भारतीय शिक्षण संस्थेचे संचालक प्राध्यापक बुद्ध प्रकाश यांच्या लेखाचा संदर्भ “बौद्ध धर्माची अभिनव व्याख्या” या लेखात प्राध्यापक बुद्ध प्रकाश यांनी बाबासाहेबांच्या सोबतची आठवण आपल्या शब्दात मांडली आहे. एकदा जुन्या सचिवालयाच्या शेजारी बाबासाहेबांना भेटायला त्यांच्या राहत्या निवासस्थानी, दिल्लीला गेलो तर बैठकीच्या खोलीत प्रवेश केल्याबरोबर प्लास्टर ऑफ पॅरीसने बनवलेल्या अवलोकितेश्वर यांच्या मूर्तीच्या दर्शनाचा लाभ झाला. विचारल्यानंतर बाबासाहेब म्हणाले, त्या मूर्तीला त्यांनी त्यांच्या भावनेनुसार बनवलेली आहे आणि ती त्यांच्या भावनांच्या विचारांचा उगम आहे आणि ती त्यांच्या भावनांचा निरंतर झरा आहे. हे वाक्य स्वतःच संदर्भ स्पष्ट करते. हा संदर्भ डॉ. चंद्र स्वरुप धम्मचारी ज्ञानसागर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण पुस्तकातून युगदृष्ट्रा डॉ. आंबेडकर यांनी सांगितलेला आहे. २०१५ मध्ये सम्यक प्रकाशन ने प्रकाशित केलेले हे पुस्तक आहे.*_

                _ही आठवण पुरावा देते की, *बाबासाहेब केवळ बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा “ॐ मणि पद्मे हुँ” चा वारंवार जपच करत होते तर त्यांची पूजा सुद्धा करत होते आणि ते त्यांच्या विचारांचे कायम ऊर्जाप्रवाह, होते. पुढे बोधिसत्व बाबासाहेब यांचे वैयक्तिक सचिव नानकचंद रत्तू यांनी त्यांच्या स्मृती वर इंग्रजीमध्ये एक पुस्तक लिहिले – Reminiscences and Remembrances of Dr. B. R. Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण या नावाने जे मुळात १९९५ मध्ये Falcon Books] B70/72,D.S.I.D.C. Complex. Lawrence Road. Delhi – 110035 द्वारे प्रकाशित झाले. आणि याची हिंदी आवृत्ती २००९ तसेच २०१२ मध्ये सम्यक प्रकाशन नवी दिल्ली द्वारे ‘बाबासाहेब डॉ. आंबेडकर संस्मरण और स्मृतिया’ या शिर्षकाने प्रकाशित झाले. या प्रकाशनाचे प्रकाशक प्रमुख श्री. शान्ति बौद्ध हस्ते २००२ मध्ये गेले. या पुस्तकातील इंग्रजी भाषेतील सुप्रसिद्ध कादंबरीकार, विशेषता, द अनटचेबल (अछूत) या कादंबरीचे लेखक मुल्कराज आनंद यांची बोधिसत बाबासाहेब यांच्या सोबतची एक मुलाखत प्रकाशित झाली*_ 

             _या संभाषणाच्या सुरुवातीच्या भागाचे भाषांतर खालीलप्रमाणे….? *मे १९५० च्या एका सुगंधित अशा एका संध्याकाळी दोन सभ्य गृहस्थ मुंबईतील कफ परेड मैदानावर एका बाकावर बसले आणि त्यांच्यातील संवाद सुरु झाला. त्यापैकी एक होते, ‘भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ, भिमराव रामजी आंबेडकर, दुसरे होते, सुप्रसिद्ध साहित्यिक आणि अस्पृश्य या कादंबरीचे लेखक मुल्कराज आनंद…* चाळीस वर्षांनंतर डॉ. आनंद यांनी दलितांच्या प्रेषिताबरोबर त्यांचे झालेल्या संवादाची उजळणी करत आहे.._

मुल्कराज आनंद : नमस्कार डॉ. आंबेडकर….. 

_*भिमराव रामजी आंबेडकर: त्यापेक्षा मला बौद्ध पद्धतीचे अभिवादन  “ॐ मणि पद्मे हुं” हे जास्त आवडेल….”विश्व कमलस्थ बुद्धाला प्रणाम असो…”*_

_मुल्कराज आनंद मी तुमच्याशी सहमत आहे. आम्ही किती विचारहिन आहोत. आम्ही शब्दांच्या अर्थाने पुनरावलोकन न करता त्यांना स्विकारतो. हे खरे आहे की, नमस्कार म्हणजे मी तुमच्यापुढे नमन करतो._ 

*_भिमराव रामजी आंबेडकर: यामुळे समर्पणाकरिता सातत्य लाभते. कमळ फुलू या यामध्ये बुद्धत्वाच्या उमलण्यासाठी ची प्रार्थना आहे._*

_मुल्कराज आनंद: खरंतर जुन्या सवयी सहजा जात नाहीत. आम्ही विचार न करता त्यांना स्विकारतो._ 

*_भिमराव रामजी आंबेडकर: प्रत्येक गोष्टीत….._*

            _ही एक लांबलचक चर्चा आहे. *ज्यात या संभाषणाच्या सुरुवातीच्या भागात बोधिसत्व बाबासाहेबांनी मुल्कराज आनंद यांच्या अभिवादनाला तसाच प्रतिसाद न देता, ॐ मणि पद्मे हुं” म्हणून उत्तर दिले,*_

             _खरंतर, चाळीस ते पन्नास वर्षात छापले किंवा ऐकले की, *ॐ मणि पद्मे हुँ च्या जागेवर पदमये असे छापण्यात आले आहे. अन्यथा बाबासाहेबांच्या प्रकाशित आवृत्तीच्या आधारावर हे अभिवादन, ॐ मणि पद्मे हुँ हेच आहे. या संभाषणाद्वारे बौद्ध मंत्र ॐ मणि पद्मे हुँ याबद्दल बोधिसत्व बाबासाहेब यांनी एका भावी कल्पनेवर प्रकाश पाडला की, ते केवळ या मंत्राचा जपच करायचे नाही तर त्यांना, याला “नमस्कार” या शब्दा ऐवजी बौद्ध समाजात एकमेकांना अभिवादन करण्यासाठी रूजवायचे होते, म्हणुनच त्यांनी मुल्कराज यांच्या नमस्काराच्या प्रतिक्रियेदाखल आपल्या प्रिय बौद्ध अभिवादनाने म्हणजेच ॐ मणि पद्मे हुँ ने उत्तर देऊन त्याचे स्पष्टीकरण देखील केले. हे अगदी खरे आहे की, नमस्कार या शब्दाचा अर्थ होतो नमन करणे, नतमस्तक होणे, ज्याअर्थी बाबासाहेब भारतात ज्या समाजाचे नेतृत्व करत होते आणि ज्या देश, देशाचे वेळेचे प्रतिनिधित्व करत होते, ते त्या समाजाला नतमस्तक नाही तर, घर येण्यासाठी, फुलण्याच्या इच्छेने बोलत होते. उठणे व फुलणे हे साधारण अर्थाने नाहीतर बुद्धत्वाच्या पदापर्यंत उठणे व फुलणे होते.*_

            _म्हणून *बहुजन समाजासाठी, एकमेकांना अभिवादनासाठी हा मंत्र त्यांनी निवडला होता. ॐ मणि पद्मे हूँ जसे शीख समाज एकमेकांना शुभेच्छा देतांना – “सत श्री अकाल” मुस्लिम समाज अभिवाद करताना, “सलाम वालेकुम, किंवा वालेकुम सलाम” सर्वात लोकप्रिय अभिवादन म्हणजे नमस्कार, अशीच बोधिसत्व यांची संकल्पना या संभाषणातून ज्ञात आहे की, बौद्धांच्या शुभेच्छा किंवा एकमेकांना अभिवादनाचे शब्द असतील, “ॐ मणि पदमे हूँ” या अभिवादन संकल्पित करण्यामागे त्यांची खूप खोल मानसिक विचारसरणी होती की, बौद्ध समाजाने न झुकता, नमन न करता उलट उठून फुलायला शिकावे.*_

              _या संदर्भात आणखी एक मनोरंजक वस्तुस्थिती नमूद करणे योग्य ठरेल की, *बोधिसत्व बाबासाहेबांवर जब्बार पटेल यांनी काढलेल्या चित्रपटातील एक दृश्य ज्यामध्ये बाबासाहेबांनी गांधीची हत्ये ची बातमी कळते, ही बातमी ऐकल्यावर बाबासाहेबांच्या हातून एक पुस्तक खाली पडते व त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात “ॐ मणि पद्मे हुँ”. हे दृश्य या चित्रपटात दाखवण्यामागे चित्रपटाच्या पटकथा लेखकाच्या प्रखर संशोधनाची खात्री पटते. “ॐ मणि पद्मे हूँ” बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा मंत्र आहे त्याचा सरळ अर्थ आहे की, ज्ञानाचे रत्न कमळाच्या हृदयात आहे… लडाख, सिक्कीम, अरुणाचल आणि तिबेट या पारंपारिक समाजामध्ये हा मंत्र अजूनही प्रचलीत आहे. परमपूज्य दलाई लामा स्वतः या मंत्राचा जप करतात.*_

              _*आश्चर्याची गोष्ट आहे की, वरील उल्लेख केलेला मंत्रांच्या संदर्भाना आजचे प्रकाशक, भाषांतरकार, संपादकांनी बाबासाहेबांच्या पुस्तकातून काढून टाकले आहेत.*_

             _*काही वेळ विवेकवादी लोक ओम तसेच नाम जपाला बुद्ध धर्मामध्ये इतर संप्रदायातून आलेले घटक आणि पद्धत म्हणतात, जेव्हा की, ते मूळ पालि तिपिटकांमध्ये मंत्रजपाचे अनेक प्रसंग आहेत, ज्यात भगवान बुद्ध स्वतः मंत्राची दीक्षा देतात. त्यांनी चूलपथकाला दिलेला “रजो हरणं” हा मंत्र हे त्याचे एक उदाहरण आहे. भगवान बुद्ध आपल्या भिक्खूंना ध्यान-साधनेसाठी जो आधार देतात त्याला कम्मट्ठान म्हणतात. हे जाणून आहे की, ४० कम्मड्डानापैकी एक कम्मट्टान म्हणजे कर्मस्थान किंवा ध्यान सरावाचा आधार मंत्र सुद्धा आहे. हा एक व्यापक विषय आहे. ॐ बद्दल सुद्धा विवेकवादी लोकांमध्ये मोठे पूर्वग्रह आहेत.*_

              _*पालि भाषेपेक्षा अधिक प्राचीन भाषा आहे प्राकृत. ॐ चा प्राचीन संदर्भ प्राकृत भाषेत आढळतो. वास्तविक ॐ हे एकच अक्षर नाही परंतु अ, उ. म या अक्षरांचा एकत्रीत आवाज आहे. ध्यान योगी हे स्वतः मध्ये आवाज ऐकतात, जो जवळजवळ अ, उ, म एकत्रित आवाजासारखा असतो. त्या एकत्रित आवाजाला ॐ दर्शवलेले आहे. म्हटले आहे. त्याला आवाजाला अनुस्वाराचा समावेश आहे म्हणून या चिन्हांमध्ये चंद्राचा ठिपका देखील आहे अनेक संप्रदायात अ, उ, म आहेत तसेच अनुस्वराचे अध्यात्मिक, धार्मिक, दार्शनिक अर्थ लावण्यात आले आहेत. प्राकृत भाषेतील मजकूरचा संग्रह सादर केलेल्या श्लोकांमध्ये ॐ एकत्रीत अक्षरांचे मूळ स्वरुप पाहावयास मिळते.*_

            _*“ओं एकाक्षर पंचपरमजष्ठिनामादिपम् तत्कथमिति चेत । अरिहंता असरीरा आचरीया तह उवज्झाया मुणियां ।। “*_

         *_- एकाक्षर ॐ पाच परमेश्वराच्या पहिल्या अक्षराने तयार झाले ते परमेश्वर आहेत अरिहंत(अ) अशरीर(अ) आचार्य (अ) उपाध्याय (उ) मुनी(म) या प्रकारे अ+अ+अ+उ+म = ॐ*_*

                _*हे माहीत असणे आवश्यक आहे की, हे पाच परमेश्वर प्रत्यक्षात भगवान बुद्धांसाठी पर्याय होत. ते अर्हत आहेत. भौतिक शरीर नसल्याने ते आता शरीरहीन अशरीरी आहेत. धम्माचे शिक्षक या अर्थाने आचार्य आहेत, धम्माची दीक्षा व जगाला शिक्षित करण्याच्या अर्थाने उपाध्याय आहेत. तसेच ते या लोकात मुनी, महामुनी, शाक्यमुनी या नावाने परिचित आहेत. अशाप्रकारे ॐ बुद्धांचा किंवा बुद्धत्वाचा पर्याय आहे. जैन पंथीय लोक ॐ ला भगवान महावीरांच्या अर्थाने वापरतात, इतर पंथीय याच ॐ ला आपआपल्या मान्यते नुसार दार्शनिक, धार्मिक, अध्यात्मिक, तांत्रिक, स्पष्टीकरण देतात. एवढेच नाही तर सारनाथ येथील राष्ट्रीय संग्रहालयात प्रवेश केल्याबरोबर डाव्या बाजूला, एका उत्खननात सापडलेली, सहा अक्षरी लोकेश्वराची एक मूर्ती जतन केलेली दिसते, जीच्या खाली मंत्र कोरलेला आहे “ॐ देअथ ” हेच शिलालेख कपिलवस्तू तसेच कुशीनगर स्तूपाच्या उत्खननात सापडलेल्या बौद्ध अवशेषांवर कोरलेले सापडले आहेत. ज्यांना कोणीही आज सुद्धा प्रत्यक्षात पाहू शकतात. सारनाथ च्या धम्मेक स्तूपावर स्वस्तिक चिन्ह, अतिशय कलात्मकतेने कोरलेली आहेत. सांप्रदायिक विचारांचे काही बौद्ध अभ्यासक देखील या संदर्भाना थेरवाद, महायान, वज्रयान, मंत्रयान इत्यादीत भेद करुन पाहतात. श्रीलंकेचे प्रसिद्ध थेरवादी भिक्खू के. चंदरतन यांनी पहिल्यांदा महापरित्राण पाठ हिंदी भाषेतून भाषांतरित केला होता, ज्यामध्ये सर्व सूत्र पालि तिपिटकातून संकलित केलेले आहेत. त्या ग्रंथाच्या शेवटी एक मंत्र देखील लिखीत आहे. न जालतीति आ, ई, ऊ, ओम इ. स्वाहा, म्हणजेच थेरवादी देशांमध्ये सुद्धा ॐ प्रचलीत आहे. सर्वात मनोरंजक वस्तुस्थिती अशी आहे की, भारतातील सर्व भाषांमध्ये आणि जगातील जवळपास सर्व भाषांमध्ये अगदी अरबी, फारस मध्ये आमीन म्हणून तसेच ग्रीक-रोमन किंवा इंग्रजीत “ओमेन” सारख्या वेगवेगळ्या स्वरुपाच्या सापडतो. याचा मूळ स्त्रोत भगवान बुद्ध आणि त्यांच्या पूर्ववर्ती कदाचित पूर्वीच्या बुद्धांपर्यंत जातो. ॐ तसेच मंत्रजप बुद्ध धर्मात इतर पंथातून घेतला आहे, असे मानणाऱ्यांनी या दिशेने सुद्धा अभ्यास करण्याची गरज आहे की, इतर पंथांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या एकत्रीत अक्षराचा मूळ उगम, स्त्रोत हा बुद्ध धम्मात आहे. खरे तर, बऱ्याच काळापर्यंत वापरातून बाद झालेल्या गोष्टींना, परंपरांना लोक विसरतात, त्यांच्या मूळ उगमापासून दूर जातात. हीच गोष्ट बाबासाहेबांनी लोकशाहीच्या सार्वजनिक तक्रारी विषयी, श्रीलंकेच्या एका पत्रकाराला सांगितले होते की, भारतीय राज्यघटनेतील लोकशाही व्यवस्था भारताच्या प्राचीन बौद्ध संघातून घेतली, फ्रान्स किंवा युरोप मधील कोणत्याही देशातून नाही. भारताला संविधान समर्पित करताना बाबासाहेबांनी त्यांच्या ऐतिहासिक व्याख्यानात म्हटले होते की, आज या देशातील लोकांना लोकशाही नवीन वाटेल परंतु भारतातील बौद्ध संघ आणि जनपद हे प्राचीन काळापासून याचा वापर करतात.*_

           _*हीच गोष्ट ॐ आणि मंत्र जाप करण्याबाबत सुद्धा आहे, त्याचे मूळ बुद्ध धम्मात समावेशित आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे लोक मुळाचा शोध न घेता, आपल्या अल्पज्ञान व पूर्वग्रहामुळे बाबासाहेबांच्या ग्रंथांमध्ये, संपादनात, काटछाट करीत आहेत. आजच्या प्रकाशकांनी बाबासाहेबांच्या पुस्तकातून व लेखांमधून “ॐ मणि पद्मे हुँ” हा मंत्र काढला आहे. सर्वात मोठा धक्का त्या दिवशी बसला, जेंव्हा एका शिक्षित भिक्खूने आपल्या सार्वजनिक प्रबोधन, प्रवचना दरम्यान एक दिवस “ॐ मणि पद्मे हुँ” चा जप करणाऱ्या श्रद्धाळू उपासकाला हे खोटे असल्याचे सांगितले. अप्रत्यक्षपणे बोधिसत्व बाबासाहेबांना चुकीचे असल्याचे सांगितले, कारण त्यांच्या पुस्तकांमध्ये हा मंत्र जपा च्या स्वरुपात आहे. या विषयावर लिहिणे आवश्यक आहे, नाहीतर जे खोटे आहे ते खरे मानले जाणार. योगायोगाने हे नमूद करणे देखील आवश्यक वाटत आहे की, बोधिसत्व बाबासाहेब दररोज बुद्धांच्या मूर्ती समोर उभे राहून, हात जोडून नियमितपणे प्रार्थना करायचे आणि नंतर चटईवर बसून नियमितपणे ध्यान करायचे, पुस्तकामध्ये पृष्ठ बाबासाहेबांचे वैयक्तिक सचिव नानकचंद रत्तू यांनी त्यांच्या आठवणीत “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुछ अनछुये प्रसंग” या पुस्तकात नमूद केले आहे.*_

          _*बौद्ध पूजा पाठ या त्यांच्या छोट्या पुस्तिकेच्या मराठी आवृत्तीच्या प्रस्तावनेत बोधिसत्व बाबासाहेबांनी शेवटी याचा उल्लेख केला आहे की, याचा पुढील भाग “बौद्ध संस्कार पाठ” नावाचे दुसरे पुस्तक प्रकाशित करतील. तो प्रकल्प बाबासाहेब त्यांच्या हयातीत पूर्ण करू शकले नाही, बाबा तुमचे ध्येय अपूर्ण आहे, आम्ही एकत्र मिळून पूर्ण करु ही घोषणा देणाऱ्यांना खरोखरच बाबांचे मिशन माहित आहे का?*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :-_*

*_१) बौद्ध पूजा पाठ_*

*_२) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी _*

*_३) मैत्री संपूर्ण धम्म आहे_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼