🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_शून्यागाराचे महत्व_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_भगवंतांनी म्हटले आहे- “जेव्हा कोणी व्यक्ती एकटा तपतो तेव्हा जसे ब्रह्मा तपतो. जिथे दोघे जण मिळून तपतात तेव्हा जसे कोणी देवता तपतात. तिघेजण एकत्र बसून तपतात तेव्हा जसे कोणी तपस्वी मनुष्य तपतात. यापेक्षा अधिक लोक एकत्र बसून तपतात तेव्हा कोलाहल होतो.” तितक्या सखोलतेने तप होत नाही, याकरीता शून्यागाराचे महत्व सर्वोपरी आहे. *शून्यागार म्हणजे असे स्थान, अशी खोली, अशी कुटी ज्याच्यात आपल्या शिवाय आणखी कोणी नाही, शून्यच शून्य. एकटा व्यक्ती एकांतात ध्यान करू शकेल, हे खूप आवश्यक असते आणि त्याचा मोठा लाभ होतो.* ब्रह्मदेशात जे ध्यानाचे केंद्र आहे, तिथल्या *शून्यागारांमध्ये जे तपस्वी तपतात, त्यामुळे तिथले तरंग कशा प्रकारे धर्माने ओतप्रोत भरलेले आहेत हे कोणी साधकच समजू शकतो. तिथे बसून ध्यान केले तर किती फरक पडेल. ठीक अशाच प्रकारे इगतपुरीमध्ये शून्यागार बनले आहेत, लोक त्यात ध्यान करतात तेव्हा किती मोठा फरक जाणवतो. शून्यागाराचे खूप मोठे महत्व आहे.*_
*_सुञ्ञागारं पविट्ठस्स, सन्तचित्तस्स भिक्खुनो।_*
*_अमानुसी रती होति, सम्मा धम्मं विपस्सती ॥_*
_*’सम्मा धम्मं विपस्सतो‘* सम्यक प्रकाराने धर्माची विपश्यना करतो. कुठे करतो- *’सुञगारं पविट्टस्स‘* एखाद्या शून्यागारात प्रवेश करून शुद्ध धर्माची विपश्यना करत असेल तर साधक शांत चित्त होतो. आणि *’अमानुसी रती होति‘* आतमध्ये असा आनंद, असा रस प्राप्त होतो जो आपल्यासारख्या मनुष्यांना सामान्यपणे आपल्या इंद्रिय सुखांच्या अनुभूतीद्वारे प्राप्त होत नाही. त्याचा कशाशी मुकाबला होऊ शकत नाही, कशाशी तुलना होऊ शकत नाही._
_त्याच्या खूप पलीकडची दिव्य अनुभूती होते, ब्राह्मी अनुभूती होते. आणि त्याच्याही पलीकडील निर्वाणिक अनुभूती होते कारण एकांतात साधना करीत आहे. कुठे कोणता व्यत्यय नाही, कोणत्या बाधा नाहीत._
_या तपोभूमीवर देखील असे शून्यागार निर्माण होतील जिथे साधक आपल्या साधनेद्वारे धर्माच्या तळस्पर्शी गहनतेपर्यंत जाऊ शकतील. *मोठ्या कल्याणाची गोष्ट होईल. कल्याण तर जे-जे तपतील, त्या सर्वांचे होणारच आहे, पण एखाद्या जरी व्यक्तीचे कल्याण झाले तर निर्माण करण्याकरीता जे श्रम, जो त्याग, ज्या कोणी केला असेल, ते सार्थक होईल. यापेक्षा अधिक मूल्य आणखी कोणते होऊच शकत नाही.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन – महेश कांबळे_*
*_संदर्भ :-_*
*_१) विपश्यना साधक” बुद्धवर्ष २५६६, चैत्र पौर्णिमा, 6 एप्रिल, २०२३ वर्ष ७ अंक १
*_२) धम्मपदपाळि- ३७३, भिक्खुवग्गो._*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


