सवाल

चल एक सवाल मी करतो,

एक सवाल तू कर,
वर्ण व्यवस्थेला बाजूला ठेऊन,
समानतेची कास धर,
चल एक सवाल तू कर,

आरक्षण म्हंटल की चवताळतो,
अँट्रोसिटी वर पेठून उठतो,
आंतरजातीय विवाहात मानवतेचा बळी घेतो,
आणि सत्यनारायण घालायला बामनच् शोधतो,

चल सांग हे आरक्षण आल कुठून…
जात सांगायला लावणार,
हे बिज उगवल कुठून,
गुण्या गोविंदानी नादणाऱ्या या देशात,
सुजलाम् सुफलाम् गाऊन घेणाऱ्या वेशात,
मानस दुभागणारी ही प्रथा आली कुठून,

चल मी मान्य केल,
ये आझादी झूटी हे, म्हणनारे अण्णा भाऊ खोटे होते,
आरक्षणाचे जनक, शाहू महाराज नीट नव्हते,
गुलामाला माणूस बनवीणारे, बाबासाहेब स्वार्थी होते,
शूद्रांसाठी विहीर मोकळी करणारे, फुले वेडे होते,
चल तू सांग,
पाटीला खराटा लाऊन,
गळ्यात मड़क घालून,
पोटाच्या खळगीसाठी,
लोकांच्या लाथा खाणारी,
ही माणस आलती कुठून,
पाण्यासाठी वनवन फिरणारे,
मेलेल्या गाईच मांस खाणारे,
‘जोहार मायबाप जोहार’ अस म्हणाणारे,
हे शुद्र आलते कुठून…

कदाचित तू म्हणशील माहित नाही,
चल मी सांगतो,
ब्रम्हा नावाचा एक तृतीय पंती होता,
भूल चुकिने त्याच्यावर बलत्कार झाला,
आणि त्याला दिवस गेले,
मंग त्याच्या मुखातून ब्राम्हण,
भहयातून क्षत्रिय,
पोटातून वैश्य,
आणि गांडीतून….?
सॉरी..सॉरी पायातून शुद्र जन्मा आले,
ते शुद्र म्हणजे हेच तुमची सेवा करणारे..
तुमच्यासाठी चपला शिवणारे,
मडकी घडवणारे,
शस्त्र बनविणारे,
मच्ची पकड़नारे,
मयतावर हलगी वाजवणारे,
मेलेल्या जनावराचे मडी ओढणारे,
तेच महार,मांग,चांभार,ढोर,लोहार कुंभार शिंपी इ.

तू म्हणशील अत्ता कुठे असली कामे राहिलित,
आत्ता कुठे जात राहिलिये,
नक्कीच मित्रा.. चल सांग हां बदल कसा झाला,
भिका मागणाऱ्या या जमातीचा उध्दार कसा झाला,
ही पुण्याई माझ्या बाबांची आहे,
ज्यांनी आडान्याणा शिक्षण दिल,
शिक्षणासाठी आरक्षण दिल,
त्यांच्या आर्थिक विकासासाठी काम दिल,
कामासाठी आरक्षण दिल,
सामाजिक विकासासाठी मतदानाचा हक्क दिला,
आणि हक्क मिळवण्यासाठी राजकीय आरक्षण दिल,
आरक्षणाची जर आंबलबजावनी झाली,
तर नक्कीच आरक्षण एकदा बंद होईल,
जेव्हा समानता प्रस्थापित होईल,
तेव्हा नक्कीच आरक्षण बंद होईल,

पिढ्यांपिढ्या माणसाला कुत्र संभोधणाऱ्या,
मानसिकतेला तीरांजली देण्यासाठी,
अँट्रोसिटी जन्मा आली,
बंधूभाव निर्माण व्हावा म्हणून,
अँट्रोसिटी जन्मा आली,
तुम्ही आणि आम्ही एक व्हाव,
म्हणून अँट्रोसिटी जन्मा आली,
तुम्ही कितीही मोर्चे काढ़ा,
कितीही विरोध करा,
या देशात जो पर्यंत जात आहे,
जातीतली असमानता आहे,
तो पर्यंत अँट्रोसिटी आणि आरक्षण जिवंतच राहणार..

कवी – प्रभु सुनगर