नामवंत ब्रिटिश तत्त्वज्ञ आणि विचारवंत बट्राँड रसेल यांनी ‘द प्रिन्सिपल्स आॕफ सोशल रिकन्स्ट्रक्शन’ शिर्षक असलेले युध्दावर आधारित एक पुस्तक लिहीले होते. १९१७ मध्ये पहिले महायुद्ध चालू असताना हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. डाॕ बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकाचे केलेले परिक्षन ‘जर्नल आॕफ द इंडियन इकाॕनाॕमिक सोसायटी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. यावेळी बाबासाहेब फक्त २५-२६ वर्षाचे होते. त्यावेळी बट्राँड रसेल पूर्ण युरोपमध्ये अतिशय प्रसिद्ध तर्कशास्त्री होते. बाबासाहेबांनी रसेलच्या पुस्तकाचे केलेले परिक्षण पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले होते की, ज्या पुस्तकासंबंधी सारा युरोप बोलण्यासाठी घाबारतो, त्या पुस्तकावर आशिया खंडातील एक व्यक्ती लिहिण्याची हिंमत कशी करू शकते ? रसेल ताबडतोब बाबासाहेबांना भेटण्यासाठी ब्रिटिश म्युजियम लायब्रेरी लंडन येथे पोहचतो. ग्रंथपालाला बाबासाहेबांविषयी विचारल्यावर त्याच्या लक्षात येते की, बाबासाहेब भारतात परत आले तेव्हा बट्राँड रसेल नाराज होतो. तो ग्रंथपालाला सांगतो की, ‘डाॕ बाबासाहेब आंबेडकर नावाचा व्यक्ती जेव्हाही येथे येईल त्यावेळी मला फोन करून बोलावून घेशील’. मला त्यांची भेट घ्यायची आहे. भारतातील जनता ओरडून सांगते की, म. गांधीजी मोठे महान होते की त्यांनी बट्राँड रसेलची भेट घेतली होती. तोच बट्राँड रसेल बाबासाहेबांच्या भेटीसाठी आतूर झाला होता. लाॕर्ड माऊंटब्याटन नी १९८४ ला लंडन येथे एक सुंदर गोष्ट सांगितली होती. माझ्या मनात एक इच्छा होती की, मी डाॕ आंबेडकर नावाच्या व्यक्तीला याच्या करीता भेटू इच्छित होतो की, ज्या विन्स्टन चर्चिल ने राष्ट्राला द्वितीय महायुद्धात विजय प्राप्त करून दिला होता तो विन्स्टन चर्चिल डाॕक्टर आंबेडकर या नावाने इतका प्रभावित का होता ? मला याचे आश्चर्य वाटते की, एक सत्ताधीश भारतासारख्या गुलाम देशांतील एका व्यक्तीने इतका प्रभावित होता. म्हणून ठरविले की, मी जेव्हा भारतात जाईन तेव्हा डाॕ आंबेडकरांची भेट अवश्य घेईन.
बट्राँड रसेलच्या ‘द प्रिन्सिपल्स आॕफ सोशल रिकन्स्ट्रक्शन’ वर लिहिताना बाबासाहेब ‘Need to kill’ आणि ‘Will to kill’ असे हिंसेसंदर्भाने विश्लेषण करतात. अडीच हजार वर्षापूर्वी तथागत बुध्दाने हिंसेसंबंधाने सिंहसेनापतीला दिलेल्या उत्तरात केलेले विश्लेषण आणि तसेच हिंसेसंबधीचे विश्लेषण डाॕ बाबासाहेब आंबेडकर बट्राँड रसेलला उत्तर देताना करतात. हे अतिशय आश्चर्यकारक आहे की, १९५६ च्या धर्मांतराच्या ४० वर्षाअगोदर तथागत बुध्दाचेच उत्तर बाबासाहेबांच्या तोंडून येत आहे. ही गोष्ट अतिशय आश्चर्यकारक आणि अलौकिक आहे.
पस्तीस वर्षे बुध्द धम्माचा मी अभ्यास केला असे बाबासाहेब सांगतात. याचा अर्थ बुध्द धम्माचा अभ्यास सुरू करण्याच्या पाच वर्षापूर्वीच हिंसेसंदर्भाने तथागताचेच विश्लेषण डाॕ बाबासाहेब आंबेडकर बट्राँड रसेल ला देतात हे आपण समजून घ्यावे…
तरीही २८ आक्टोबर १९५४ ला ‘बुध्द, कबीर आणि फुले हे माझे तीन गुरू आहेत’ असे म्हणणाऱ्या बाबासाहेबांचा हा greatness प्रतीकांचे उदात्तीकरण करणाऱ्यांच्या लक्षात येत नाही ही शोकांतिका आहे. मुक्तीदाता परमप्रिय डाॕ बाबासाहेब आंबेडकरांची ही माहानता त्यांच्या वेदनेशी एकरूप होऊनच समजता येते…
फक्त बाबासाहेब !


