माय…

माय तुझ्या उदरात जन्म घेतला ना

तेव्हाच या जिवनाचे पांग फिटले…
कारण तुझ्यामुळे मला
बाबासाहेब नी बुद्ध भेटले ….

हे विचार म्हणजे एक वेगळीच दिशा….
नवक्रांतीची नवकिरणांची आशा…..

सोबतीला रमाई माऊली….
भिमाईची सावली ….
जिजाऊंची तलवार….
आणि सावित्रीमाईच्या लेखनीची धार….

हा वारसा जणू न मागताच मिळाला ….
अन् जगण्याचा खरा अर्थच कळाला ….

हा जन्म म्हणजे हा वारसा पुढे नेण्याची जिद्द ….
या जन्मातच जगावर कोरायचेत बुद्ध …..

तु नसतीस माझी माय
तर खरं सांग ही शक्ती कुठून आली असती….
दगडा समोर मी ही कुठेतरी
टाळ कुटत राहीली असती….

म्हणूनच माय आता तू दिलेल्या जन्माचे
खरे सार्थक करेन….
वचन आहे माझे तुला
माझ्या प्रत्येक कवितेतून
बाबासाहेब आणि बुद्ध पेरेन …..

जय भिमच