अप्रमादीच (भिक्षु ) प्रगती करतो.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अप्रमादीच (भिक्षु ) प्रगती करतो._*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अप्पमादरतो भिक्खु पमादे भयदस्सि वा ।_*

*_संयोजनं अणुं थूलं डहं अग्गी व गच्छति ॥_*

*_अर्थ – जो भिक्षु अप्रमादात आनन्द मानतो व प्रमादाला भितो तो अग्नी प्रमाणे लहानमोठ्या बन्धनांना जाळीत पूढे जातो._*

जेतवनातील एक भिक्षु तथागतांजवळ कम्मट्ठान शिकून अरण्यात निघुन गेला. प्रयत्नांची पराकाष्ठा करून जेव्हा तो अर्हतपद प्राप्त करू शकला नाही, तेव्हा तो पुन्हा परत भगवंताकडे यावयास निघाला. मार्गात दावाग्नी भडकला होता. भीतीने तो एका छोट्या पर्वतावर चढला आणि त्या आगीकडे पहात विचार करू लागला – *“ज्या प्रमाणे ही आग लहान मोठ्या सर्व तृणास जाळत चालली आहे, त्याचप्रमाणे श्रेष्ठ मार्गाचे ज्ञान लहान मोठा सर्व क्लेशास जाळत असावे.”* बुद्धांनी गंधकुटीत बसुन त्याचे विचार जाणून – “असेच आहे भिक्षु ! असेच आहे भिक्षु ! *ज्ञानाच्या अग्निने ह्या लहान मोठ्या सर्व क्लेशांना जाळून टाकावे जेणेकरून ते पुन्हा उत्पन्न होण्याच्या योग्य राहणार नाहीत.”* असे म्हणाले.

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन – महेश कांबळे_*

*_दिनांक :-२९/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद – अप्पमादवग्ग, अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼