🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_पूजनीय भन्ते गलगेदर प्रज्ञानंद महाथेर_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_१४ ऑक्टोबर १९५६ रोजी, विजयादशमीच्या दिवशी भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व बाबासाहेबांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह नागपूरमध्ये बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. असा बुद्ध विनय आहे की, धम्मदीक्षा कोणा व्यक्ती कडून नव्हे तर, संघाकडून दिली जाते. तेव्हा “सघं शरणं गच्छामि” हे म्हणणे सार्थ ठरते. बोधिसत्व बाबासाहेबांनी त्यांच्या लाखो अनुयायांना धम्मदीक्षा सप्तवर्गिय भिक्खू संघाकडून दिली होती._
१) भदन्त चंद्रमणी महाथेर,
२) भिक्खू प्रज्ञातिस्स,
३) भिक्खू एम. संघरतन महाथेर.
४) भिक्खू सुमेध,
५) भिक्खू एच. सध्दा तिस्स,
६) भिक्खू एच. धम्मानंद महाथेर,
७) भिक्खू गलगेदर प्रज्ञानंद.
_*सप्तवर्गीय भिक्खू संघामध्ये सर्वात तरुण होते, भन्ते प्रज्ञानंद त्यावेळी ते २८ वर्षाचे होते, मूळचे श्रीलंकेचे वयाच्या तेराव्या वर्षी भारतात येऊन नव्वद वर्षापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ते पुण्यभूमि भारतातच राहीले. या संघामध्ये परमपूज्य भन्ते चंद्रमणी हे मूळचे ब्रह्मदेशातून होते, त्यांच्याबरोबर बोधिसत्व बाबासाहेब यांची पहिली भेट सहाव्या परिषदेदरम्यान १९५४ ला रंगून येथे बर्मामध्ये झाली, सुमित भन्ते भारतातील होते, आणि उर्वरित पाच भन्ते श्रीलंकेचे होते.* ज्यात सर्वात लहान होते प्रज्ञानंद भन्ते. *भन्ते प्रज्ञानंदाचा जन्म श्रीलंकेतील कँडी जिल्ह्यातील गलगेदर या गावी झाला. त्यांच्या गावाच्या नावावरुन त्यांचे नाव प्रज्ञानंद गलगेदर पडले.* आईचे नाव रम्मेनिका वाहील मुदियांसी हे कुटुंब पारंपरिक बौद्ध होते. त्यांच्यासाठी भारत पुण्यभूमी होती, वडिलांची चहाची बाग होती घरात सुख समृद्धी होती. श्रीलंकेतील तसेच बौद्ध देशातील प्रत्येक गाव-शहरांप्रमाणे येथे ही एक विहार होते, जिथे अष्टमी, अमावस्या, पौर्णिमा, या दिवशी उपोसथ ठेवत. *प्रज्ञानंद लहान असताना बुद्धांच्या गोष्टी ऐकत असे, त्याला भारताबद्दल प्रचंड श्रद्धा निर्माण झाली होती, त्याच दरम्यान महाबोधि सोसायटी ऑफ इंडियाच्या एका नियतकालिकात एक जाहिरात छापून आली की, भारतातील जेष्ठ भन्ते बोधानंद यांना श्रीलंकेच्या पारंपारिक बौद्ध कुटुंबातून एक मुलगा हवा आहे, ज्याला ते त्यांचा शिष्य म्हणून त्याला धम्म शिकवतील. महाबोधी सोसायटीचे तत्कालीन सरचिटणीस देवप्रिय वली सिंह हे देखील मूळचे श्रीलंकेचे तसेच भन्ते बोधानंदाचे मित्र होते. त्यांच्या सहकार्याने ती जाहिरात महाबोधी च्या मासिकात प्रसिद्ध झाली होती. गावातील भन्तेंनी ती जाहिरात वाचून प्रज्ञानंद यांच्या परिवाराशी चर्चा केली. कुटुंबातील लोकांच्या आधी छोट्या प्रज्ञानंदाला आनंद झाला होता की, त्याला पुण्यभूमी ला जाण्याची संधी मिळेल, तो जाण्यास तयार झाला. जरी तो यावेळी फक्त १३ वर्षाचा होता, दस्तऐवजानुसार त्याची जन्मतारीख १८ डिसेंबर १९२७ होती, व जाहिरात १९४० मधली होती. कुटुंबाच्या परवानगीने छोट्या प्रज्ञानंदाला घेऊन गावातील भन्ते कोलंबोला पोहोचले. ज्या ठिकाणी पात्रतेच्या आधारे मुलांची निवड होणार होती, सात मुलांपैकी दोन निवडले, त्या दोघांमध्ये प्रज्ञानंद होते.*_
_भन्ते प्रज्ञानंदाचे घरचे नाव सुद्धा हेच होते, तसेच दिक्षेनंतर सुद्धा ते याच नावाने राहिले. *महाबोधी सोसायटीद्वारे भारतात पोहोचल्यावर भदंत बोधानंदांनी प्रज्ञानंदला शिष्य म्हणून स्विकारले. देव प्रिय वली सिंहाने त्याला लखनऊला आणले होते. विसाव्या शतकामधील हा बौद्ध धम्माच्या जागरणाचा काळ होता. तेव्हा एकाहून एक लोक कार्यरत होते. चटगाव सध्याचे बांग्लादेशचे भन्ते कृपा शरण माहास्थवीर कार्यरत होते, कुशिनगर येथे महाविर महास्थविर चळवळ बघत होते. तामिळनाडूमध्ये पी. लक्ष्मी, नरसू कामकाज पाहत होते. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ मध्ये केंद्र बनवून तिथे भदन्त बोधानंद कार्य करीत होते.*
_*बोधिसत्व बाबासाहेब भन्ते बोधानंदाच्या कार्याने प्रभावित होते, तसेच जेव्हा ते लखनऊ ला येत तेव्हा ते रिसालदार पार्क, लालकुआं विहारात भन्ते बोधानंदांना भेटायला जरुर येत असत, तसेच त्यांच्या बरोबर तासनतास धम्मचर्चा करीत. १८ एप्रिल १९४८ ला बोधिसत्व बाबासाहेबांचा या विहारात आल्याचा फोटो उपलब्ध आहे. बाबासाहेबांना हवे असलेले दुर्मिळ ग्रंथ त्यांना या विहारात ग्रंथालयातून मिळाले.* पुन्हा १९५१ एप्रिल मध्ये बाबासाहेब येथे येण्याची नोंद आहे पण फोटो नाही. *महाबोधी सोसायटीचे सरचिटणीय अनागरिक धम्मपाल यांचे शिष्य, देवप्रिय वली सिंह तेरा वर्षाच्या छोट्या प्रज्ञानंदाला घेऊन २० ऑक्टोबर १९४१ लखनऊ मधील या विहारात आले. तसेच भन्ते बोधानंदाला हस्तांतरित केले. याच विहारात ३० एप्रिल १९४२ भन्ते बोधानंदांकडून प्रज्ञानंदाची श्रामनेर दीक्षा झाली, व त्यांचे दिक्षीत नाद श्रामणेर गलगेदर प्रज्ञानंद झाले.* सोप्या शब्दात, बुद्ध धम्मात श्रामणेर दिक्षेला छोटी दिक्षा तसेच उपसंपदेला मोठी दिक्षा म्हणतात. *श्रामणेर दिक्षेच्या वेळी महापंडित राहुल सांस्कृत्यायन, डॉ. भदंत आनंद कौसल्यायन तसेच भिक्खू महानाम हजर होते. प्रज्ञानंद यांची मोठी दिक्षा म्हणजे उपसंपदा १९४८ ला सारनाथ येथे बोधानंदांकडून त्याच सिमेमध्ये पार पडली, ज्या ठिकाणी अनागरिक धम्मपाल यांची दिक्षा झाली होती. सारनाथ मध्ये उपसंपादक दिक्षा घेणारे दुसरे भिक्खू प्रज्ञानंद होते.*_
_*भन्ते प्रज्ञानंद यांची सीमा दिक्षा घेऊन ४ वर्षा नंतर, भन्ते बोधानंद यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी पौर्णिमेला, ११ मे, १९५२ ला कलकत्ता येथे देहत्याग केला. त्यांच्या चळवळीची सर्व जबाबदारी त्यांच्या पंचवीस वर्षीय धम्मपुत्र भन्ते गलगेदर प्रज्ञानंदावर येऊन पडली. गुरु बोधानंदाचे परिनिर्वाण प्रज्ञानंदासाठी दुसरे भावनिक वळण आले, ते १० वर्षाचे असतांना आईचे निधन तर वडिलांचे निधन त्यांच्या लहानपणीच झाले होते. भारतात येऊन या धरतीला आई आणि गुरु बोधानंदांना वडील मानले होते, गुरुंचे जाणे त्याच्या आयुष्यातील भावनिक धक्का होता. गुरु बोधानंदाचे अनुयायी आणि १९१६ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या “भारतीय बौद्ध समिती” च्या सदस्यांनी सामूहिक निर्णय घेऊन भन्ते गलगेदर प्रज्ञानंदांना विहार तसेच समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.*_
_भारतीय बौद्ध महासभेच्या तत्वाखाली भन्ते बोधानंदानी बौद्ध साहित्य प्रकाशनाचे काम सुरु केले होते. त्यावेळी बौद्ध संस्काराची कोणतीच पुस्तके उपलब्ध नव्हती, *भन्ते बोधानंदानी “बौद्ध चर्या पद्धती,” “श्रामनेर विनय,” “भगवान बुद्ध,” मूल भारतवाशी आणि आर्य इ. पुस्तके प्रकाशित केली. बौद्ध संशोधन ग्रंथालय स्थापन केले. भन्ते प्रज्ञानंद यांनी गुरुंच्या कार्याला अधिक व्यापक स्वरुप दिले. एक-एक करुन त्यांनी एकूण ६५ पुस्तकांचे प्रकाशन केले. त्यामध्ये महापंडित राहुल सांस्कृत्यायन यांनी भाषांतरित केलेले “मज्झिम निकाय” हे सुद्धा होते. त्यानंतर त्यांनी मध्यममार्ग नावाचे साप्ताहिक सुरु केले. जे तीन वर्षे सातत्याने यशस्वी झाले, आणि नंतर पैशाच्या अभावामुळे बंद पडले. यानंतर भन्ते प्रज्ञानंद यांनी त्यांचे लक्ष लोकांच्या हिताकरिता सामाजिक कार्याकडे केंद्रित केले. “मानव उत्थान मिशन” नावाची एक संस्था स्थापन केली. ज्यामध्ये त्यावेळचे डॉ. गया प्रसाद प्रशांत आणि रायबरेली चे श्री. रामनाथ अमलकारी यांचे विशेष योगदान होते. या संस्थेच्या माध्यमातून भन्तेजींनी “मानव उत्थान” नावाचे मासिक सुरु केले. या संस्थेच्या उत्तर प्रदेशातल्या बऱ्याच जिल्ह्यात शाखा सुरु केल्या तसेच एक शाखा मध्यप्रदेशात सुद्धा उघडण्यात आली. भन्तेजींच्या जिवनातले दुसरे निर्णायक वळण बोधिसत्व बाबासाहेब डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या धम्मदीक्षा कार्यक्रमात उपस्थित राहणे. ज्याप्रमाणे भन्तेजी सांगतात की, बाबासाहेबांना त्यांचे गुरु भन्ते बोधानंदांकडून दिक्षा घ्यायची होती, आणि एकदा तर त्यांनी लखनऊमध्ये भन्ते बोधानंदांसमोर भिक्खू बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु १९५२ मध्ये भन्ते बोधानंदाचे परीनिर्वाण झाल्यामुळे, धम्मदीक्षेच्या कार्यक्रमात भन्ते प्रज्ञानंद यांनी गुरुचे प्रतिनिधित्व केले.* सप्तवर्गीय भिक्खूंमध्ये सर्वात तरुण, केवळ अट्ठाविस वर्षाचे होते._
_भन्ते प्रज्ञानंद सर्व जिवनभर याच कारणाने लोकप्रिय नाहीत की, ते केवळ बाबासाहेबांच्या धम्मदिक्षेच्या कार्यक्रमाचा एक भाग होते, परंतु धम्मदिक्षेनंतर फक्त ५३ दिवसात बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर भन्ते प्रज्ञानंद यांनी धम्मदिक्षेची चळवळ सुरु ठेवली, त्याला पुढे आणून विकसित केले. *बाबासाहेबानंतर भन्ते लखनऊ येथील उद्यानात धम्मदीक्षेचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यात बाबासाहेबांचे दिक्षा गुरु भन्ते चंद्रमणी महात्थेर स्वतः उपस्थित होते. या कार्यक्रमात १९५७ ला जवळपास पाच हजार लोकांनी दिक्षा घेतली. लखनऊ च्या धम्म दिक्षेनंतर भन्तेंनी अलीगड, जालंधर (पंजाब) देशातील अनेक ठिकाणी धम्मदीक्षेचे कार्यक्रम आयोजित केले त्यामध्ये लाखो लोकांनी दिक्षा घेतली.* बोधिसत्व बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर संपूर्ण भारतभर धम्मदीक्षेच्या चळवळीव्यतिरिक्त *पूजनीय भन्तेंनी इतर सामाजिक प्रकल्प, धार्मिक प्रकल्पांवर ही उल्लेखनीय कार्य केले. बरेच बौद्ध साहित्य प्रकाशित केले. “मध्यम मार्ग” नावाचे मासिक सुरु केले. त्यांच्याकडून आशिर्वाद घेऊन समन्वय सेवा समितीने याच नावाने मासिक सुरु केले पूजनीय भन्तेजींवर बरेच अंक ही काढले. भन्ते गलगेदर प्रज्ञानंद महात्थेरांनी श्रावस्ती च्या बौद्ध स्थळांच्या संरक्षणार्थ विशेष काम केले. १९९४ मध्ये जेतवन विद्यालयाची स्थापना केली. ज्यात इंटरमीडिएट पर्यंतचा अभ्यास शिकवला जातो. १९८४ मध्ये कुशीनगर येथे प्रस्थापित जपानी बुद्धविहाराच्या निर्मितीमध्ये पण त्यांचे योगदान आहे.*_
_*भारतात कुठेही भिक्खू प्रशिक्षण केंद्र नव्हते. भन्तेंनी जपानी गुरु रेन-चेन यांच्या स्मरणार्थ श्रावस्तीमध्ये भिक्खू प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. ज्यात भन्तेंनी त्यांच्या हयातीत जवळपास २०० लोकांना श्रामनेर दिक्षा देऊन भिक्खू बनविले, जवळपास सहा श्रमनेरांना उपसंपदा स्वतः दिली, यामध्ये पूजनीय भन्ते उपानंद, पूज्य भन्ते पञ्ञासार, पूज्य भन्ते सुमनरत्न, पूज्य भन्ते ज्ञानलोक, पूज्य भन्ते धम्मप्रिय, पूजनीय भन्ते देवेंद्र, पूज्य भन्ते संघरक्षित प्रमुख आहेत. ४० ते ५० वयाचे आज जेवढे भिक्खू भारतात किंवा परदेशात प्रमुख सक्रिय आहेत त्यातील जास्तीत जास्त श्रामनेर दिक्षा भन्ते कडून घेतलेले आहेत. या प्रशिक्षण संस्थेत त्यांनी केवळ बुद्धधम्माचे प्रशिक्षण न देता जेतवन विद्यालयात त्यांना आधुनिक अभ्यासक्रम तसेच हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान शिकवले. विद्यार्थ्यांची फी आणि शिक्षकांचा पगार त्यांनी मिळवलेल्या रकमेतून दिला. धर्मप्रचारासाठी तसेच श्रद्धावान उपासक-उपासिकांचे आमंत्रण स्विकारून भन्तेंनी जपान, इंग्लंड, अमेरिका, श्रीलंका येथे बऱ्याच वेळा प्रवास केला.*_
_भारतीय नवबौद्धांना एकदा ते म्हणाले, भारताचे नवबौद्ध त्रिपिटक साहित्याच्या दृष्टीने जास्त शिक्षित नाहीत, म्हणून त्यांना बौद्ध परंपरेविषयी आवड नाही, बौद्धांच्या नियमांचे ज्ञान नाही. परदेशातून लोक मोठ्या आशेने भारतात येतात, परंतु नवबौद्धांना भेटून निराश होतात, माझा संदेश आहे की, त्यांनी त्रिपिटक बौद्ध साहित्य वाचावे, बौद्ध परंपरा रितीरिवाज परत सुरु कराव्या, आपली अशी ओळख निर्माण करा की, विदेशातील लोकांवर छाप पडेल._
_*महाबोधी सोसायटी चे संस्थापक, अनागारिक धम्मपाल यांनी शपथ घेतली होती की, त्यांना परत जन्म भारतातच हवा. आणि गलगेदर प्रज्ञानंद यांची प्रतिज्ञा होती की, श्रीलंकेत जरी जन्मलो, तरी भारत हीच माझी धम्मभूमी आहे. म्हणून मी ह्याच पुण्यभूमीत देहत्याग करणार पूजनीय भन्तेंची प्रतिज्ञा पूर्ण झाली, ३० नोव्हेंबर २०१७ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी लखनऊ या शहरात देहत्याग केला.* त्यांचा अंतिम संस्कार १७ डिसेंबर २०१७ ला श्रावस्ती मध्ये संपूर्ण राजकीय सन्मानाने झाला._
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन :- महेश हरिश्चंद्र कांबळे_*
*दिनांक :-* ३१/१०/२०२४
*_लेखक :- राजेश चन्द्रा_*
*_संदर्भ:- मैत्री सम्पूर्ण धम्म आहे_*
🙏🙏🙏 *_भवतु सब्ब मङ्गलं_*🙏🙏🙏
🙏🙏🙏 *_नमो बुद्धाय_*🙏🙏🙏
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


