इंडिया भिमाच्या धाकातं

छाती ठोकुन सोगतोय रं मी लाखों लोकात
आन इंडिया हाय सारा माझ्या भिमाच्या धाकात
धनवान बलवान असो र किती
भिम कलमाची त्याला रे भिती
जोर, जुलूम, अन्यायाप्रती
कायदा भिमाचा करतोय माती
अशी किमया हाय न्यारी
त्याच्या पेनाच्या टोकात
आन इंडिया हाय सारा माझ्या भिमाच्या धाकात

ये नामदार आमदार आनं खासदार
घटनेचे ते सारे चाकर
कोर्टामधले जज- वकिल
वाचून घटना करी कारभार
घातली कायदयाची एसन,
यसन भल्याभल्याच्या नाकात्
आन इंडिया हाय सारा माझ्या भिमाच्या धाकात

उच्च नीच ना इथर, कोनी टाटा बिरला असो अंबानी एकामताचा हा हक्क देऊनी
समान सर्वा केलं भिमानी
त्यानं मिटविला भेदभाव
म्हणून जगतोय सुखात
आन इंडिया हाय सारा माझ्या भिमाच्या धाकात

विषमतेच उगडून मूळ
हुकुमशाहिची जिखील कळ
लोकशाहिन दिलं हे बळ
भिमाच्या श्रमाला आलया फळ
भिम – बुद्‌धाच्या कृपने
चाले सचिन झोकात
आन इंडिया हाय सारा माझ्या भिमाच्या धाकात