मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषणातून (मे 1924, बार्शी, जि. सोलापूर)
“अमुक एक गोष्ट (जातिभेदामुळे) करता येत नाही वगैरे आवेशयुक्त बोल ऐकून (आपल्या लोकांना) त्वेष येत नाही; याचे कारण त्यांना या अन्यायाची जाणीव होत नाही. मनुष्य एखाद्या हुद्द्यावर चढण्यास लायक असताना जर त्याला जातिभेदांमुळे तो हुद्दा प्राप्त होत नाही, तर तशा माणसाला जातीभेद कसा नडतो हे त्याला कळू लागेल व त्याला आपल्या चळवळीचे मार्ग कळून तो तिचा पुरस्कर्ता होईल. पण ज्याला त्या जागेवर जाण्याची लायकी नसेल, तर त्याला जातीभेदाचे उग्र स्वरूप कसे कळणार? जातीभेद असला काय आणि नसला काय, तो आहे तिथेच राहणार. म्हणून आपल्या लोकांची लायकी वाढण्याची आपण काळजी घेतली पाहिजे.”
~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर


