गावामध्ये गाव आहे ते महुगाव
तिथं जन्मले भिमराव सख्खे बाई गं
भिमाई त्यांची माता रामजी त्यांचे पिता
झाला दलितांचा नेता सखे बाई ग
जन्मले भिमराव सखे बाई ग
डोळ्याच्या करून वाती
शिकला दिनराती
तोच रमाईचा पती सखे बाई ग
जन्मले भिमराव सखे बाई ग
दलितांचा बाप आई काय सांगू गं नवलाई
झाला बामनाचा जावई संख्य बाई गं
जन्मले भिमराव सखे बाई ग
मनूचा तो काळ त्यांचे कुळ सकपाळ
मयूर त्याच बाळ सखे बाई ग..
जन्मले भिमराव सखे बाई ग
गावामध्ये गाव आहे ते महुगाव
तिथं जन्मले भिमराव सख्खे बाई गं…


