गाडीत घ्या हो मला

थांबा हो थांबा गाडी वाले दादा
करितो विनंती भीवा माझे नाव
राहिले फार दूर माझे गाव
गाडीत घ्या हो मला
मला… गाडीत घ्या हो मला
गाडीत घ्या ना मला
मला…..गाडीत घ्या ना मला

गाडीवान बोले जात सांग बाळा
दिसतो खरोखर तू लई भोळा
भीवा बाळ बोले
मी महार वेळा
गाडीवान बोले थांब बाळ थोडा
बाटेल माझी गाडी आणि मी
कसा घेऊ तूला मी तुला
गाडीत घ्या हो मला
मला…. गाडीत घ्या हो मला

दिवसाचा घोडा अस्त्मान झाला
काळोख वाढे क्षणा क्षणाला
करावे कसे हे सुचे ना आम्हाला
दुपट्टी ने भाडे देतो तुम्हाला
येऊ द्या दया हो या पामरांची
बसहूनी घ्या मला घ्या मला
गाडीत घ्या हो मला…..
गाडीत घ्या हो मला…..