माहिती | तपशील |
---|---|
गाण्याचे नाव (Song Name) | महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा |
गायक (Singer) | कडुबाई खरात |
गीतकार (Lyricist) | धम्मा धनवे |
संगीत (Music) | हिराल कंबळे (DJ HK Style) |
अल्बम (Album) | Majhya Bhimacha Darara Hay – Single |
परवा न केली दुधाची तुझ्या जिजा ग… ~~ २
झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग… ।। धृ ।।
धन्य धन्य तू जिजाई माता
जिने जन्माला असा विधाता
भल्या भाल्यांची घेतली त्याने आता मजा ग … ~~ २
झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग… ।। १ ।।
शिवबा जन्मला आलाच नसता
मानव धर्म बुडाला असता
भल्या भाल्यांची घेतली त्याने आता मजा ग … ~~ २
झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग… ।। २ ।।
बालपणातच घेऊन शिक्षण
मातृभूमीचे केले रक्षण
म्हणे पारस आरती घेऊन मूर्ती पूजा … ~~ २
झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग… ।। २ ।।
परवा न केली दुधाची तुझ्या जिजा ग… ~~ २
झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग…