शहाणे लोक अप्रमादाचे धनासारखे रक्षण करतात.

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_शहाणे लोक अप्रमादाचे धनासारखे रक्षण करतात_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पमादमनुयुञ्जन्ति बाला दुम्मेधिनो जना ।_* 

*_अप्पमादंच मेधावी धनं सेट्ठं व रक्खति ॥_*

*_अर्थ – मुर्ख, असमंजस लोक आळसात मग्न राहतात. बुद्धिमान पुरूष श्रेष्ठ धनाप्रमाणे आपल्या उत्साह शीलतेचे रक्षण करतात._*

_त्या काळी भारतातील काही भागात अशी एक प्रथा होती की सातदिवस केवळ मौजेसाठी म्हणून कुणाविषयी ही कठोर भाषा वापरण्यास मुभा होती, *त्याला ते बाल-नक्षत्र म्हणत असे (हाच सण पुढे जाऊन होळी म्हणून प्रचलित झाला असे माझे वैयक्तिक मत आहे… कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे)* त्या काळात बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांना उपासक विहारातून बाहेर पडू नका अशी विनंती करीत असे तसेच त्या सर्व काळात उपासक – उपासिका स्वतःहुन भगवंत आणि त्यांच्या शिष्यांसाठी भोजन घेऊन विहारात जात असत._

_श्रावस्तीमद्ये बाल-नक्षत्राची घोषणा झाली. एक आठवड्या पर्यन्त उपासक उपासिका घराबाहेर पडले नाही तसेच भिक्षु पिण्डपाता करीता नगरात गेले नाही. *आठवडा संपल्यावर आठव्या दिवशी तथागतांबरोबरच भिक्षुसंघाला महादान देतांना उपासक तथागतांना म्हणाले ” भन्ते ! हे दिवस आमचे फारच दुःखात गेले. मुर्खांच्या शिव्या ऐकणाऱ्याचे कान फुटल्यासारखे होत होते, कोणीही कशाचीही लज्जा बाळगीत नव्हता.”*_

_तथागतांनी त्यांचे ऐकले आणि त्यावर ते म्हणाले – *मुर्ख आणि गावंढळाचे काम असेच असते, परन्तु बुद्धिवान लोक श्रेष्ठ धनाच्या समान अप्रमादाचे रक्षण करून अमृत महानिर्वाण सम्पत्तिस प्राप्त करतात.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन – महेश कांबळे_*

*_दिनांक :-२७/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद – अप्पमादवग्ग, अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼