माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर | Mazi Ajii Mhanayachi Ovi Hi Jatyavar Lyrics Song – Mazi Ajii Mhanayachi Ovi Hi Jatyavar |

 

Lyrics by – Kiran Sonavane

Singer – Aniruddha Vankar

Release Date – Year 2017

 

माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर | Mazi Ajii Mhanayachi Ovi Hi Jatyavar Lyrics |

 

माझी आजी म्हणायची

ओवी ही जात्यावर

भीम बनला सावली

कोटी कोटीच्या माथ्यावर

 

राही लहान्या खोलीत

केला अभ्यास रस्त्यावर

नाही खुर्ची टेबल

कधी बसला पोत्यावर

माझी आजी म्हणायची…

 

नाही भिमाने ठेवली

कधी सुपारी दातावर

पहा आजचे पुढारी

बसती दारू गुत्त्यावर

माझी आजी म्हणायची…

 

नाही राहिला विश्वास

आता एकाही नेत्यावर

बेकी करू नका किरण

तुम्हच्या पडेल पथ्यावर

माझी आजी म्हणायची…

 

माझी आजी म्हणायची

ओवी ही जात्यावर

भीम बनला सावली

कोटी कोटीच्या माथ्यावर

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?