चांदण्याची छाया कापराची काया | Chandanyachi chaya kaparachi kaya lyrics

Song Title – Chandanyachi Chaya
Lyrics – Wamandada Kardak
Singer – Pralhad Shinde

चांदण्याची छाया, कापराची काया
माऊलीची माया होता, माझा भीमराया

चोचीतला चारा, देत होता सारा
आईचा उबारा देत होता सारा
भीमाईपरी चिल्यापिल्यांवरी
पंख पांघराया होता, माझा भीमराया

बोलतात सारे, विकासाची भाषा
लोपली निराशा आता लोपली निराशा
सात कोटी मधी, विकासाच्या आधी
विकासाचा पाया होता, माझा भीमराया

झाले नवे नेते, मलाईचे धनी
वामनच्या मनी येती जुन्या आठवणी
झुंज दिली खरी, रामकुंडावरी
दगड गोटे खाया होता, माझा भीमराया

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?